AmravatiLatest News

अमरावती महानगरपालिका व ओपन लिंक्स फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने नव्या शैक्षणिक पर्वाचा प्रारंभ

अमरावती : शासकीय शालेय शिक्षणात गुणवत्ता आणि नवोपक्रम आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, आयुक्त सौ. सौम्या शर्मा यांच्या संकल्पनेतून अमरावती महानगरपालिका ने आज ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमा’ चा शुभारंभ केला आहे.

पुणे येथील ‘ओपन लिंक्स फाऊंडेशन’ (OLF) च्या सहकार्याने राबवला जाणारा हा उपक्रम, जिल्ह्यातील शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सक्षम बनवून त्यांच्या कार्याला नवी दिशा देणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘विनोबा ॲप’ चा प्रभावी वापर. संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांना परस्परांशी जोडून, त्यांच्यात संवाद साधून आणि नवनवीन कल्पनांची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देऊन शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात विनोबा ॲप ने यश मिळवलं आहे. या अभिनव ॲपमुळे शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एक मजबूत व्यासपीठ मिळेल आणि त्यांच्यातील परस्पर संवाद वाढून एक सक्षम शिक्षक समुदाय निर्माण होईल. यामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळेल आणि ते उत्साहाने नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवू शकतील.

अमरावती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक तसेच मनपा उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षण विभागातर्फे विविध नवनवीन उपक्रम राबविले जात असून त्यामुळे पटसंख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येते. त्याच प्रमाणे या उपक्रमामुळे केवळ शिक्षकांचे सक्षमीकरणच होणार नाही, तर प्रशासकीय स्तरावरही याचा मोठा फायदा होणार आहे. विविध शैक्षणिक कार्यक्रमांची अंमलबजावणी यामुळे अधिक सुलभ आणि वेगवान होईल. विनोबा ॲपद्वारे निर्माण होणारा हा गतिमान संवाद आणि सहभागाचा दुवा प्रशासनाला शिक्षकांपर्यंत पोहोचण्यास आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास मदत करेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल

या निमित्ताने अमरावती महानगरपालिका येथील शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख आणि तंत्रस्नेही शिक्षक यांची एकदिवसीय कार्यशाळा आयुक्त आमरावती महानगरपालिका येथील सभागृहात आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती, या प्रसंगी अमरावती महानगरपालिका आयुक्त श्रीमती सौम्या शर्मा चांडक यांनी “अमरावती महानगरपालिकाच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हटले “आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’ हा केवळ तंत्रज्ञानाचा अवलंब नसून, तो शिक्षकांना प्रेरणा देऊन आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे आपल्या अमरावती महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी होईल, याची आम्हाला खात्री आहे.” असे आपल्या

मार्गदर्शनपर भाषणातून नमूद केले.

ओपन लिंक्स फाऊंडेशन चे श्री. विजय वावगे (CDM) यांनी या प्रसंगी सांगितले की, “शिक्षक हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहेत. विनोबा ॲपच्या माध्यमातून त्यांना जोडण्यासाठी, शिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी एक शक्तिशाली साधन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यामुळे वर्गातील अध्ययनानुभव खऱ्या अर्थाने बदलून जाईल. अमरावती महानगरपालिका सोबतची आमची ही भागीदारी शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्याची शक्ती दर्शवते.”

अमरावती महानगरपालिका आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि त्याचा दूरगामी सकारात्मक परिणाम सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहेत, ज्यामुळे शासकीय शालेय शिक्षणात एक नवीन आणि उत्कृष्ट पर्व सुरू होईल. *यावेळी ओपन लिंक फाउंडेशनचे श्री. विजय वावगे ( CDM), श्री सागर गजभिये (जिल्हा प्रकल्प अधिकारी), श्री. रघुनाथ वानखडे (कार्यक्रम व्यवस्थापक),* यांच्यासह अमरावती महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेतील तंत्रस्नेही केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button