विद्यापीठात ‘डॉ. पंजाबराव देशमुख लिखित धर्माचा वैदिक वाङ्मयातील उदय आणि विकास’ यावर विशेष व्याख्यान 17 जुलै रोजी आयोजन

डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राचा उपक्रम
अमरावती – अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात डी.फिल. पदवीसाठी केलेल्या संशोधनाच्या शताब्दी निमित्ताने दिनांक 17 जुलै, 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार इतिहास संशोधन केंद्र येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हर्षवर्धन देशमुख उपस्थित राहतील. प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथील धर्म व तत्वज्ञानाचे जेष्ठ अभ्यासक डॉ. प्रदीप गोखले हे ‘डॉ. पंजाबराव देशमुख लिखित धर्माचा वैदिक वाङ्मयातील उदय आणि विकास’ यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देतील.
सर्वांनी डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राच्यावतीने आयोजित व्याख्यानास जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.



