City CrimeLatest News

धक्कादायक! पैशाच्या वादातून मित्राची हत्या, मृतदेह सेप्टिक टँकमध्ये लपवला

अमरावती : अमरावती शहराला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. पैशाच्या वाटणीवरून झालेल्या वादामुळे मित्रांनीच मित्राची हत्या करून मृतदेह एसआरपीएफ कॅम्पमागील ब्रिटिशकालीन क्वार्टरमधील सेप्टिक टँकमध्ये लपवल्याचे उघड झाले आहे. गाडगे नगर पोलिसांच्या डीबी स्कॉडने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ दिवसांपूर्वी या पाच मित्रांना एक क्रेडिट कार्ड सापडले होते. या कार्डचा वापर करून त्यांनी सोने खरेदी केले आणि ते विकून मिळालेल्या पैशांची वाटणी करण्यासाठी हे सर्वजण एसआरपीएफ कॅम्पजवळील जंगलात गेले. तिथे त्यांनी एकत्र दारू प्यायली. पैशाच्या वाटणीवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. याच वादातून चार मित्रांनी मिळून रिझवान मुलाणी या अल्पवयीन मुलाची हत्या केली.

गुन्हा लपवण्यासाठी मारेकऱ्यांनी रिझवानचा मृतदेह एसआरपीएफ कॅम्पमागे असलेल्या ब्रिटिशकालीन सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला. गाडगे नगर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने १२ दिवसांपूर्वी मित्राची हत्या केल्याची कबुली दिली.

या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरसाट तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कसून तपास सुरू केला आहे. पोलीस एसआरपीएफ क्वार्टरमधील घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत. या प्रकरणातील इतर तीन आरोपींचा शोध फैजपूर पोलीस घेत आहेत. मृत रिझवान मुलाणी हा पुण्यातील चिंचवड येथील घरकुल कॉलनीचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button