AmravatiLatest News

अमरावतीत पर्यावरण दिनानिमित्त भाजप साई मंडळाचा वृक्षारोपण उपक्रम

अमरावती : पर्यावरण संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश देणाऱ्या “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाअंतर्गत अमरावतीतील दातेराव लेआऊट, गायत्रीनगर परिसरात वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम पार पडला. भाजप साई मंडळातर्फे आयोजित या उपक्रमाचे नेतृत्व भाजपचे प्रभाग क्र. 20 चे प्रमुख डॉ. नितीनजी धांडे यांनी केले.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात अशोक, गुलमोहर, जांभूळ, करंज, चिंच यांसारख्या स्थानिक प्रजातींची 50 हून अधिक झाडे लावण्यात आली.

कार्यक्रमाला भाजपचे माजी सभागृहनेता सुनीलभाऊ काळे, संयोजिका सौ. राधाताई कुरील, सौ. वंदनाताई हरणे, राजूभाऊ कुरील, साई मंडळाच्या अध्यक्षा सौ. भारतीताई गुहे, तसेच राजूभाऊ कीटुकले, पप्पूभाऊ जोशी, सौ. मेघा हिंगासपुरे, सौ. जया माहुरे, सौरभ रत्नपारखी, कार्तिक सामदेकर, सचिन फणसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमात सौ. शितल वाघमारे, सौ. कल्याणी मुदलियार, सौ. शुभांगी टाले, सौ. ज्योत्सना शेटे, सौ. बबीता राठोड, किशोर निवळ, विलास माहुरे, डॉ. प्रताप तिडके, भूषण दलाल यांचाही सक्रीय सहभाग होता.

या वेळी “वृक्षारोपण म्हणजे फक्त झाडे लावणे नाही, तर निसर्गाशी असलेली आपली नाळ घट्ट करणे आहे,” असा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह युवक मोर्चाचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button