Amaravti GraminLatest News

अचलपूर नगर परिषदेमधील भ्रष्टाचार प्रकरण चिघळले; शासन प्रशासन भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात – किशोर मोहोड यांचा आरोप

अचलपूर :- अचलपूर नपा मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठउनही संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी चाल-ढकल होत असल्याचा आरोप रिपाई अध्यक्ष किशोर मोहोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे
दलित वस्ती सुधार योजना एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजना रमाई आवास योजना व इतर विकास कामासाठी आलेल्या निधीची उधळपट्टी करून संबंधित गब्बर झालेले अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव यांनाही निवेदन.देऊन बराच कालावधी लोटला असला तरी अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही
याबाबत रिपाई शहर अध्यक्ष किशोर मोहोड यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की अचलपूर नगर परिषद मधील करोडो रुपयाचा शासकीय निधी वळती करून समंधित अधिकारी पदाधिकारी यांनी सन 2010-11ते 2018-19 या काला वधित भ्रष्ट्राचार करनाऱ्यांचा महापुर आला होता त्या विरोधात अचलपूर शहरातील दिड लाख जनतेमधून एक सामान्य नागरिक रिपाई चे शहर अध्यक्ष किशोर मोहोड यांनी अचलपूर नगर परिषद मध्ये होत असलेल्या दलित वस्ती सुधार योजना एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजना रमाई आवास योजना व इतर विकास कामा साठी आलेल्या निधीची उधळपट्टी करून गब्बर झालेले अधिकारी पदाधिकारी यांनी केलेल्या भ्रष्ट्राचारा विरोधात सन 2018 ला किशोर मोहोड यांनी. राज्य मानवी हक्क आयोग येथे केस दाखल केली होती त्या अनुषंघाने दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ला राज्य मानवी हक्क आयोगाचे कोर्ट नंबर 3 चे न्यायाधीश संजय कुमार यांनी प्रधान सचिव नगर विकास 2 यांचे नावे कारवाई करण्यासाठी ऑर्डर केली आहे. तसेच नवि 15 व नवि 18 मंत्रालय महाराष्ट्र शासन यांना मुख्याधिकारी नगर परिषद यांनी 47.48.11.813 रुपये निधी वळती केल्या बाबत स्पष्ट शासनास अहवाल सादर केला असून त्या मध्ये 8 अध्यक्ष 23 मुख्याधिकारी व 5 लेखाधिकारी यांची नावे कारवाई करण्यासाठी पाठविण्यात आलेली असुन यांच्यावर करवाही करण्यासाठी मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांनाकिशोर मोहोड यांनी पत्र दिले आहे तसेच 2023 ला हिवाळी अधिवेशन मध्ये तारांकित प्रश्न क्रमांक 72051 चा निकाल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न 2 व 3 चे उत्तर सादर केली आहेत (2) सह आयुक्त नगर पालिका प्रशासन विभागीय कार्यालय अमरावती यांनी दिनांक 18/07/2023 रोजीच्या पत्रान्वये तपासणी अहवाल जिल्हा सह आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना पाठविला आहे हे खरे आहे. असे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले (3) या संदर्भात विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयाने दिनांक 18/07/2023 रोजी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या कडे तपासणी अहवाल कार्यवाही साठी पाठविला असुन त्यामध्ये अचलपूर शहरातील रोडच्या बाजूस ब्लॉक बसविणे या कामाचे अंदाजपत्रक निष्काळजी पणे बनविल्याबाबत तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या जागेत बदल करण्यात आला असल्याचे निष्कर्ष नमूद केले आहे या बाबत समंधिता कडून खुलासा मागविण्यात येत असुन त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे उत्तर हिवाळी अधिवेशन नागपूर 2023 ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी अमरावती यांनी केली नाही व शासनाने समंधित जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांच्या कडून खुलासा मागविण्यासाठी त्यांना करणे दाखवा नोटीस देण्याचा प्रस्थाव सादर करण्यात यावा असे पत्र जिल्हाधिकारी अमरावती यांना दिनांक 11/12/2023 रोजी श्री वि. ना. धाईजे. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी पत्र दिल्यावर सुद्धा जिल्हाधिकारी यांनी पत्राची अंमलबजावणी केली नाही अचलपूर नगर परिषद मधील या तिन्ही प्रकरनाकडे लक्ष लागल्याचे दिसुन येते या तिन्ही प्रकरना मध्ये चौकशी समितीने भ्रष्टाचार झाला हे शिक्का मोर्तब केले आहे तरी शासनाने त्वरित समंधित अधिकारी पदाधिकारी यांच्यावर कार्यवाही न केल्यास मला उच्च न्यायालयात जनहीत याचिका लागेल असेही मोहोड यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रतिनिधी – नितेश किल्लेदार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button