AmravatiLatest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

निवडणुकांच्या तोंडावर केवळ भूमिपूजन नाही तर उघड्या डोळ्याने दिसेल असा विकास  केल्यामुळे डॉ.सुनील देशमुख यांच्या पदयात्रांना उदंड प्रतिसाद

 वाह रे  पंजा.. आला रे पंजा… च्या घोषणांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, कपिलवस्तू नगर निनादले  

महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.सुनील देशमुख यांच्या सह खासदार बळवंत वानखडे यांच्या  पदयात्रांना जनसामान्यांची प्रचंड साथ मिळत आहे. नागरिक स्वयंस्फूर्तीने या पदयात्रांमध्ये सहभागी होऊन अमरावती शहरात त्यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावतीच आपल्या समर्थनातून त्यांना देत आहेत

अमरावती शहराच्या विलास नगर ,रमाबाई आंबेडकर ,नगर कपिल वस्तू नगर ,जय सियाराम नगर, शिवनगर, संतोषी नगर या परिसरामध्ये डॉ. सुनील देशमुख यांची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. हा संपूर्ण परिसर कष्टकरी श्रमजीवी नागरिकांचा असून डॉ. सुनील देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात वाल्मिकी आंबेडकर योजनेअंतर्गत घरकुलांचे निर्माण केलेले होते. पूजा वस्त्यांचा मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधांच्या बाबतीत कायापालट सुद्धा केलेला होता. सातत्याने आजवर या परिसरातून डॉक्टर सुनील देशमुख यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळत असतो. त्याचा प्रत्यय आजच्या पदयात्रेद्वारे आज पुनश्च अनुभवायला आला. मोठ्या संख्येने महिला ,पुरुष, अबाल वृद्ध सर्वांनी पदयात्रेत सहभाग घेऊन अत्यंत उत्स्फूर्तपणे आपण डॉ.सुनील देशमुख यांच्या  पर्यायाने महाविकास आघाडीच्या व  काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे सिद्ध केले. या संपूर्ण परिसरामध्ये प्रामुख्याने  आंबेडकरी समुदाय बहुसंख्येने रहिवासी असून या परिसरातील विविध बुद्ध विहारांमध्ये उत्स्फूर्तपणे नागरिकांनी डॉ. सुनील देशमुख यांचे स्वागत केले. पदयात्रा भ्रमण करीत असताना विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करीत डॉ.सुनील देशमुख यांनी  विनम्र अभिवादन करून जय संविधानांचा नारा बुलंद केला.

निवडणुकांच्या तोंडावर ठिकठिकाणी विकास कामांचे फलक लावून केवळ भूमिपूजनांचा झालेला भडीमार या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण अमरावतीकरांनी अनुभवलेला आहे. यातील कोणती कामे होतील व कोणती होणार नाहीत याचा खुद्द ज्यांनी याचे भूमिपूजन केले त्यांना सुद्धा अंदाज नाही. खरे पाहता निवडणुकांच्या तोंडावर जनतेच्या डोळ्यात अशी धूळफेक करणे हा तर जनतेसोबत  केलेला एक प्रकारचा द्रोहच आहे. ही  फसवणूक आता नागरिकांच्या लक्षात आलेली असून पाच वर्षे काही न करता केवळ भंपक पत्रक बाजी करणे आणि निवडणुकांच्या तोंडावर भूमिपूजनांचा देखावा करणे. याचा जनता आता या विधानसभा निवडणुकांमध्ये समाचार घेणार आहेत.

ठिकठिकाणी होत असलेल्या या प्रचार पदयात्रांमध्ये नागरिकांची उत्स्फूर्त सहभाग ही या निवडणुकीत डॉ.सुनील देशमुख यांच्या विजयाची खऱ्या अर्थाने नांदी ठरणार आहे अशी सार्वत्रिक भावना नागरिकांमध्ये होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button