AccidentNewscitynewsLatest NewsMaharashtraWashim

समृद्धी महामार्गावर कार-ट्रकची भीषण धडक; एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

लोहारा परिसरातील अपघातात २० वर्षीय तरुणीची प्रकृती गंभीर; मुंबईहून नागपूरकडे जात होते सिन्हा कुटुंबीय

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका २० वर्षीय तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. हा अपघात सायंकाळच्या सुमारास नागपूर लेनवर वनोजा ते कारंजा दरम्यान लोहारा परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील सिन्हा कुटुंबातील पाच जण कारने समृद्धी महामार्गावरून मुंबईहून नागपूरकडे प्रवास करत होते. लोहारा परिसरात कार चालक विकास सिन्हा यांना झोपेची डुलकी लागल्याने भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर कार महामार्गाच्या बाजूला असलेल्या स्टील गार्डला धडकली.

या भीषण अपघातात कार चालक विकास सिन्हा आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांची २० वर्षीय मोठी मुलगी अनया सिन्हा गंभीर जखमी झाली. पत्नी आनंदा सिन्हा आणि १० वर्षीय लहान मुलगी युवा सिन्हा यांनाही दुखापत झाली आहे.

अपघातातील तिन्ही जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button