BreakingNewsBreakingNewsMaharashtracitynewsLatest News

सोनेगावात घरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

पत्नीचे वारंवार फोन करूनही उत्तर नाही; घरी आल्यानंतर पती बेशुद्ध अवस्थेत आढळला, सोनेगाव पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

नागपूरच्या सोनेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे वारंवार फोन करूनही उत्तर मिळत नसल्याने घरी आलेल्या पत्नीला पती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उज्ज्वल नगर परिसरात ही घटना घडली आहे. मुळीक कॉम्प्लेक्समध्ये राहणारे ३४ वर्षीय प्रतीक पुरुषोत्तम बारसिंगे यांना त्यांच्या पत्नीने वारंवार फोन केला. मात्र फोनला प्रतिसाद मिळत नसल्याने त्या आपल्या आईच्या घरून घरी परतल्या.

घरी आल्यानंतर दरवाजा टेकवलेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा उघडून घरात पाहणी केली असता, हॉलमधील गॅलरीजवळ ठेवलेल्या कुलरच्या बाजूला प्रतीक बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले.

यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सकाळी सुमारे ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

वैद्यकीय सूचनेवरून सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश राठोड करत असून, प्रतीक बारसिंगे यांच्या मृत्यूचे नेमके कारण तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

सोनेगावातील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रतीक बारसिंगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या मृत्यूमागचं नेमकं कारण काय आहे, हे पुढील तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button