AccidentNewsBreakingNewsHighwayAccidentJabalpur HighwayLatest NewsMaharashtraMaharashtraNewsNagpurRoadRollerTruckAccident

नागपूर–जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रक–रोड रोलर धडकेत दोघे जखमी

नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज.

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पवनी उड्डाण पुलावर आज सकाळी एक थरारक अपघात घडला. ट्रक चालकाला डुलकी लागल्याने ट्रकने समोर असलेल्या रोड रोलरला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून मोठी जीवितहानी थोडक्यात टळली आहे.

नागपूरकडून जबलपूरकडे जाणारा DL 1 LAQ 4542 क्रमांकाचा ट्रक पवनी उड्डाण पुलावरून जात असताना चालकाला अचानक झोपेची डुलकी आली. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोर देवलापारच्या दिशेने जात असलेल्या रोड रोलरला मागून जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी होती की रोड रोलर रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पोलवर जाऊन आदळला. या अपघातात रोड रोलरचे पुढील चाक तुटून मोठे नुकसान झाले. अपघातानंतर पुलावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. या घटनेत ट्रक चालक आणि त्याचा सहप्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे हा अपघात उड्डाण पुलावर घडूनही दोन्ही वाहने वेळेत थांबली, त्यामुळे वाहन पुलावरून खाली कोसळण्याचा संभाव्य धोका टळला आणि मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

चालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button