कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; तरीही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून, दर $108 प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत… मिडल ईस्ट मधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे… मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे भारतात आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत…
जागतिक स्तरावर वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरांचा परिणाम भारतात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, तेल कंपन्यांनी आजही दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही…
महानगरांमधील आजचे दर असे —
- दिल्ली : पेट्रोल ₹94.77, डिझेल ₹87.67, एलपीजी ₹913
- मुंबई : पेट्रोल ₹103.54, डिझेल ₹90.03, एलपीजी ₹912
- कोलकाता : पेट्रोल ₹105.41, डिझेल ₹92.02, एलपीजी ₹939
- चेन्नई : पेट्रोल ₹101.06, डिझेल ₹92.48, एलपीजी ₹928.50
जागतिक बाजारात दर वाढले असले तरी देशांतर्गत बाजारात सध्या स्थिरता कायम आहे… मात्र, पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही…
कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे… त्यामुळे येत्या काळात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी दरांमध्ये बदल होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…



