AmravatiLatest NewsSocial News

युवाशक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख – जनरल मनोज पांडे यांचे प्रतिपादन

विद्यापीठाच्या 42 वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

अमरावती –      “तरुण पिढी ही केवळ देशाचे नागरिक नसून ती भारताच्या परिवर्तनाचा आणि प्रगतीचा एक अविभाज्य भाग आहे. येणा-या काळात विविध क्षेत्रांतील नेतृत्वाची धुरा तुम्हा तरुणांच्या खांद्यावर असेल, युवा शक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख असल्याचे प्रेरणादायी उद्गार भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 42 वा दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर.एम. कडू, श्री हर्षवर्धन देशमुख, डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. आर.डी. सिकची, डॉ. व्ही.एच. नागरे, डॉ. व्ही.एम. मेटकर, डॉ. विद्या शर्मा, डॉ. ए.एम. बोर्डे, डॉ. मनिषा कोडापे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, अधिष्ठाता डॉ. अरूण हरणे, डॉ. एच. आर. देशमुख, डॉ. मोना चिमोटे, डॉ. वैशाली गुडधे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आयक्युएसी संचालक डॉ. संदीप वाघुळे, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. व्ही.आर. मानकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अभय खांबोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
                 जनरल मनोज पांडे यांनी या प्रसंगी पदवी प्राप्त केलेल्या विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ‘तीन सी’ चा मंत्र दिला. चरित्र, क्षमता आणि आचरण हे यशाचे तीन आधारस्तंभ आहेत. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि नैतिक धैर्य हे उत्तम माणसाचे लक्षण आहे. विद्याथ्र्यांनो हेच गुण तुम्हाला योग्य मार्ग निवडण्यास मदत करतील. आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य सतत अद्ययावत ठेवा. आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासा.  शिस्त, सांघिक कार्य आणि सहानुभूती या गुणांमुळे तुम्ही समाजात वेगळी ओळख निर्माण करू शकाल. बदलाचा स्वीकार करा. ते पुढे म्हणाले, प्रगती ही बदलाशी जोडलेली असते. जुन्या विचारसरणीला आव्हान देऊन नवनवीन कल्पनांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. “केवळ प्रयत्न करून थांबू नका, तर परिणामांवर आणि सकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करा,” असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
                  आजच्या तांत्रिक युगावर भाष्य करताना ते म्हणाले की, तंत्रज्ञान आपली क्षमता वाढवत असले तरी, भावनिक बुध्दिमत्ता आणि मानवी मूल्ये यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर करताना माणुसकी विसरू नका. यावेळी जनरल पांडे यांनी विद्याथ्र्यांच्या यशात शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या असलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. शिक्षक हे विद्याथ्र्यांच्या आयुष्यातील मार्गदर्शक तारे आहेत, जे त्यांना जीवनाच्या प्रवासात योग्य दिशा दाखवतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. शेवटी, तुम्ही ज्ञानाचे दूत आणि बदलाचे वाहक म्हणून जगात वावरा. देशाच्या प्रगतीची मशाल तुमच्या हातात आहे, असेही त्यांनी युवकांना सांगितले.
                   नेहरु कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नेर परसोपंत येथील कु. निकीता किशोर पुनसे या विद्यार्थीनीने 06 सुवर्ण व 1 रोख पारितोषिक, आर.ए. कला, एम.के. वाणिज्य व एस.आर. राठी विज्ञान महाविद्यालय, वाशिम येथील कु. पल्लवी बालकृष्ण राठोड या विद्यार्थीनीने 05 सुवर्ण व रौप्य 1 रोख, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव येथील कु. तेजस्विनी विठ्ठल भगत आणि विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथील कु. साई·ारी सत्यजित इंदुरकर या विद्यार्थीनीने प्रत्येकी 4 सुवर्ण  पारितोषिके प्राप्त केली आहेत. दीक्षांत समारंभात या विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते पदके व रोख पारितोषिके देवून गौरवान्वित करण्यात आले. दीक्षांत समारंभात 80 टक्के पदके मुलींना, तर 20 टक्के पदके मुलांना मिळाली.

 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 42 व्या दीक्षांत समारंभामध्ये डॉ. कमल रामक्रिष्ण गवई यांना मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत राज्यशास्त्र विषयात वाङ्मय पंडित (डी.लिट) या सर्वोच्च पदवीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या सन्मानार्थ गौरवोद्घोषाचे वाचन करण्यात आले.
या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय 466 संशोधकांना आचार्य पदवी देवून सन्मानित करण्यात आले. पदके प्राप्त करणा-यांमध्ये निकीत टिकैत या दिव्यांग विद्याथ्र्याचा सुध्दा समावेश आहे.  या प्रसंगी अधिष्ठात्यांनी पदवीकांक्षी व आचार्य पदवीकांक्षींना सादर केले. यावेळी कुलगुरूंनी विद्याथ्र्यांना अनुग्रह दिला.

कृत्रिम बुध्दिमत्तेशी जुळवून घेत विद्याथ्र्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत करावीत : कुलगुरू   

                  “आजचे युग हे ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुध्दिमत्तेचे आहे. विद्याथ्र्यांनी या बदलांना घाबरून न जाता नवीन कौशल्ये आत्मसात करावीत. एआय हे रोजगाराची नवीन दालने उघडणारे तंत्रमित्र ठरेल,” असे मत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मिलींद बारहाते यांनी अध्यक्षीय भाषण करतांना व्यक्त केले. विद्यापीठाच्या 42 व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते.
                       विद्यापीठाशी सध्या 451 महाविद्यालये संलग्न असून सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावर्षी 42,317 विद्याथ्र्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आल्या. बदलत्या काळानुसार विद्यापीठाने पदवी स्तरावरील सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमात ‘एआय’चा अनिवार्य घटक म्हणून समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने संशोधनात मोठी झेप घेतली असून, यावर्षी प्राध्यापक आणि विद्याथ्र्यांनी दक्षिण आफ्रिकेचे पेटंट मिळवण्यासह एकूण 12 पेटंट्सवर मोहोर उमटवली आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावर सतत भर दिला जात आहे. ‘इंद्रधनुष्य’ सारख्या इतरही आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये आणि खेलो इंडिया, सॉफ्ट बॉल स्पर्धा सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विद्यापीठाच्या विद्याथ्र्यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक यशाचे कुलगुरूंनी कौतुक केले. संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीचे पालन करत विद्यापीठ गरजू विद्याथ्र्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजना आणि विविध शिष्यवृत्ती राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. कुलगुरूंनी आपल्या भाषणाचा शेवट संत तुकाराम महाराज आणि कवी केशवसुत यांच्या ओळींनी करत विद्याथ्र्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
                        संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, विद्यापीठ गीत व सरस्वती स्तवनाने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. पाहुण्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अतिथींचा परिचय करुन दातृनामावलीचे वाचन केले. संचालन डॉ. सुलभा पाटील व डॉ. प्रणव कोलते यांनी केले. पसायदानाने व राष्ट्रगीताने दीक्षांत समारंभाची सांगता झाली. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश श्री भूषण गवई, महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही.एस. जामोदे, डॉ. प्रसाद वाडेगावकर, माजी कुलसचिव डॉ. वंदन मोहोड, प्रा. सी.डी. देशमुख, डॉ. बी.आर. वाघमारे, डॉ. तुषार देशमुख तसेच डॉ. ·ोता मिलींद बारहाते, प्रा. स्वाती महेंद्र ढोरे व सौ. ओजस्विनी अविनाश असनारे तसेच एन.सी.सी.चे अधिकारी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींचे सर्व सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पाचही जिल्ह्रातील गुणवत्ताधारक विद्यार्थी, आचार्य पदवीधारक, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक याशिवाय शहरातील गणमान्य नागरिक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button