अ.भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल महिला स्पर्धेतही अमरावती विद्यापीठ अव्वल

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी महिला संघाचा केला सत्कार
अमरावती (दि. 10.02.2026) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 1 फेब्राुवारी पासून सुरू झालेल्या ‘अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेचा मंगळवारी समारोप झाला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला संघाने सुध्दा सर्वांवार मात करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकाचा मान मिळविला. तर उपविजेता संघ लवली प्रोफेशनल युनिव्र्हसिटी, जालंधरने रजत पदक, कालिकत विद्यापीठ व चंदिगड युनिव्र्हसिटीने कांस्य पदक पटकाविले. यावेळी ट्रॉफी व पदके देवून मान्यवरांच्या हस्ते चारही चमूंना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे कौतूक करुन खेळामध्ये जय-पराजय होत असतो, परंतु त्यामुळे खचून जावू नये. सहभाग देखील तितकाच महत्वाचा असून हा आपल्या जीवनातील महत्वाचा क्षण असतो असे सांगून पुरुष स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सुवर्ण पदक पटकाविले, तर महिला स्पर्धेतही अमरावती विद्यापीठाने सुवर्ण पदकाचा मान मिळवून राष्ट्रीय स्तरावर आपल्या विद्यापीठाचा नावलौकीक केला आहे. सर्व खेळाडू, प्रशिक्षक तसेच मार्गदर्शक यांचे त्यांनी भरभरुन कौतूक करुन अभिनंदन केले. समारोप समारंभामध्ये अध्यक्षीय भाषण करतांना ते मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबू इंगोले, उपाध्यक्ष श्री जयवंत उर्फ भैय्यासाहेब पुसदेकर, कार्यकारिणी सदस्य श्री सुरेशराव खोटरे, श्री सुभाषराव बनसोड, प्राचार्य डॉ. जी.व्ही. कोरपे, प्राचार्य अंबादास कुलट, श्री दिलीप तिरके, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत, डॉ. रुपाली इंगोले आदी उपस्थित होते.
कुलगुरू म्हणाले चारही दिवस अतिशय चुरशीच्या लढती झाल्यात. थोड¬ाशा फरकाने जय-पराजय होत असतो. मात्र सर्व संघाच्या चमूंनी अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. देशभरातून आलेल्या खेळाडूंना अधिकाधिक चांगल्या सुविधा पुरविण्याकडे आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. संघाच्या प्रशिक्षक, मार्गदर्शक यांनी सुध्दा आपल्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे, त्यामुळे खेळाडू उत्कृष्टरित्या खेळलेत. मुलांच्या स्पर्धेत आणि आता मुलींच्या स्पर्धेतही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सुवर्ण पदक प्राप्त करुन राष्ट्रीय स्तरावर आपल्या विद्यापीठाचा नावलौकीक केला आहे, असे सांगून त्यांनी दोन्ही संघाचे भरभरुन अभिनंदन केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. दिलीपबाबू इंगोले म्हणाले, आपण सुध्दा व्हॉलिबॉल खेळाडू होतो व कालिकत विद्यापीठामध्ये झालेल्या स्पर्धेत आपण आपल्या संघाकडून खेळलो, असा उल्लेख करुन विजेचा ठरलेल्या चारही टीम उत्कृष्ट आहेत. थोड¬ाशा फरकाने हारजीत होत असते व त्यातही सर्वांनी आपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन केले आहे. स्पर्धेदरम्यान खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक यांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर चांगली मैदाने देखील आम्ही उपलब्ध करुन दिलीत, असेही ते म्हणाले.
यावेळी लवली प्रोफेशनल युनिव्र्हरसिटीची खेळाडू अनुराधा भिंगारे व संघ मार्गदर्शक प्रभारिका गौर यांनी मनोगत व्यक्त करतांना चांगल्या सुविधांबद्दल अमरावती विद्यापीठ तसेच आयोजक महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी विविध विद्यापीठांच्या प्रशिक्षक, मार्गदर्शक, अम्पायर तसेच स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणा-या सर्व शारीरिक शिक्षण संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोपटे देवून सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट टिचर पुरस्कार कंचन (लवली प्रोशनल युनिव्र्हसिटी, जालंधर) बेस्ट कॅचर ममता (पंजाब विद्यापीठ), बेस्ट फास्टमॅन हन्सा मोल (कालिकत विद्यापीठ), बेस्ट सेकंड फास्ट मॅन सोनी (पंजाब युनिव्र्हसिटी, चंदिगड), बेस्ट थर्ड मॅन दिव्या (जालंधर विद्यापीठ), बेस्ट शॉट (नवदीप पंजाब विद्यापीठ, चंदिगड), बेस्ट लेफ्ट लॉक कमला (पंजाब युनिव्र्हसिटी, चंदिगड), बेस्ट सेंटर लॉक अ·िानी (कालिकत विद्यापीठ), बेस्ट राईट लॉक सँड्रा (कालिकत विद्यापीठ), ऑल राऊंडर क्षितिजा (संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिक्षण महर्षि डॉ. भाऊसाहेब देशमुख व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने समारंभाची सुरूवात झाली. डॉ. रुपाली इंगोले यांनी स्पर्धेच्या शुभारंभापासूनची रुपरेखा सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंतिका मानकर चौधरी व डॉ. रेखा मग्गीरवार यांनी, तर आभार क्रीडा संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे पदाधिकारी तसेच खेळाडू मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



