ऐतिहासिक! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कासोळात श्री महाकाली मातेची भव्य प्राणप्रतिष्ठा

पुसद : पुसद तालुक्यातील कासोळा (देव) येथे प.पू. समर्थ सदगुरू श्री गजानंद माऊली यांच्या प्रेरणेने एका ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णशिला दगडापासून साकारलेल्या ‘दसभुजा व वरदहस्त श्री महाकाली मातेच्या’ मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
भव्य मूर्ती आणि ठिकाण
श्री क्षेत्र महाकाली संस्थान, महर्षी मातंग ऋषी आश्रम व नंदलाल गोरक्षण, कासोळा (देव) येथे ही भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठित केली जाणार आहे. सदगुरू श्री गजानंद माऊली यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रथमच कृष्णशिला दगडापासून निर्मित, अभयमुद्रा आणि वरदहस्तमुद्रेत विराजमान असलेली दसभुजा श्री महाकाली मातेची मूर्ती प्राणप्रतिष्ठित होत आहे.
महाराष्ट्रासह चार राज्यांतील भाविक
या अद्वितीय सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह शेजारील राज्ये – तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक – येथून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून भाविकांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह राज्यातील अनेक आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत.
सदगुरू श्री गजानंद माऊली यांचे आवाहन
प.पू. समर्थ सदगुरू श्री गजानंद माऊली यांनी सर्व भाविक भक्तांना या ऐतिहासिक व भव्य-दिव्य सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आवाहन केले आहे.



