India NewsLatest NewsMaharashtra

जनतेच्या मनात आम आदमी पार्टी कायम राहणार – राखी बिर्ला

अमरावतीतील रुक्मिणी नगर येथील योग मंगल कार्यालयात आज आम आदमी पार्टीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिल्लीच्या माजी मंत्री राखी बिर्ला उपस्थित होत्या.
यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मेळाव्यात बोलताना राखी बिर्ला म्हणाल्या की — आम आदमी पार्टीने देशाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.
दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आता महाराष्ट्रातही आम आदमी पार्टी जनतेच्या मनामध्ये जागा निर्माण करत आहे.
त्यांनी सांगितले की पक्षाचा उद्देश स्वच्छ राजकारण आणि सामान्य जनतेसाठी काम करणे हा आहे.
आगामी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही राखी बिर्ला यांनी केले.
मेळाव्यादरम्यान पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मेळावा यशस्वी पार पडताच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण दिसून आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button