अतिदृष्टी सदृश्य पावसामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भातकुली तालुक्यात शंभर टक्के नुकसानभरपाईची मागणी

अमरावती : यावर्षी महाराष्ट्रात झालेल्या अतिदृष्टी सदृश्य पावसामुळे राज्यातील सर्वच जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, कापूस तसेच फळबागेच्या शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातही शेतकऱ्यांचे पीक संपूर्णपणे उध्वस्त झाले आहे.
शेतकऱ्यांच्या या प्रचंड नुकसानीवर सरकारकडून त्वरित आणि शंभर टक्के नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी भातकुलीतील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सोमवारी, 29 सप्टेंबर रोजी तालुका तहसील कार्यालयावर शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि जोरदार निदर्शन केले.
शेतकऱ्यांनी सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या:
शंभर टक्के नुकसानभरपाई मिळावी.
प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची त्वरित नुकसान भरपाई द्यावी.
शेतकऱ्यांचे कर्ज माफी करावी.
पीक विमा योजनेचे प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
शेतकऱ्यांना ई-केवायसीसाठी सेतू केंद्रांचा वापर न करता थेट डीबीटी माध्यमातून मदत रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी.
भातकुली तालुक्याचे तहसीलदार यांना या मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले असून, कर्जमाफी आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या दुष्काळग्रस्त समस्यांकडे प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधले गेले आहे.



