भाजपा नेत्या व स्टार प्रचारक मा.खा. सौ.नवनीत राणा यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतांची केली पाहणी

भाजपा नेत्या व स्टार प्रचारक मा.खासदार सौ.नवनीत रवी राणा यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावां गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतांची केली पाहणी
राज्याचे कृषीमंत्री ना.दत्तात्रय भरणे व जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याशी दुरध्वनीव्दारे मा.खा.नवनित राणा यांनी अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिवाळीपुर्वी देण्यासंदर्भात केली चर्चा
पाहणी दरम्यान शेतकऱ्यांचा शेतामधिल कापूस, सोयाबीन, ज्वारी, व संत्री यांचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची पंतप्रधान श्री.नरेद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साहेबांना केली विनंती
अमरावती – संपूर्ण अमरावती जिल्हायामध्ये पावसाने कहर केला असून गेल्या 01 महिन्यापासुन पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतातील पिकांचे अंतोनात नुकसान झाले व शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरीता व मदत मिळवुन देण्याकरीता अमरावती जिल्हयाच्या माजी खासदार सौ.नवनित रवि राणा हया सरसावल्या असून दर्यापुर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावा-गावातील शेतकऱ्यांचा बांधावर जावुन नुकसान झालेल्या शेताची नुकतीच पाहणी केली. बांधावरुनच माजी खासदार नवनित राणा यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व अमरावती जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना दुरध्वनीव्दारे शेतातील परीस्थिती सांगुन सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासंदर्भात चर्चा केली.
यामध्ये शेतकऱ्यांचा शेतामधिल कापुस,सोयाबीन, ज्वारी व संत्री या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याचे आढळुन आले. आधिच कर्जबाजारी होवुन शेताची पेरणी केली. परंतु दिवाळी सारख्या मोठया सनाच्या तोंडावर निसर्गाने पुन्हा दगा देऊन अतीवृष्टीने शेतकऱ्यांचा आनंद हिसकावल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे.
त्यामुळे शेतकरी दुखाच्या खाईत पडला असून शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची विनंती देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस साहेबांना मा.खा.नवनित राणा यांनी यावेळी केली. यामध्ये दर्यापुर तालुक्यातील आमला, थिलोरी, माऊली, खल्लार, कोकर्डा, लेहगांव, सामदा, सांगळुद, सासन, सागंवा, चिचोंली, चिचोंरी रहिमापुर तसेच अंजनगाव सुर्जी मधिल सातेगाव, गावंडगाव, काळगव्हाण, हिंगणी, चिचोली, टाकरखेड,धनेगाव, पांढरी, कापुस तळणी, हंतोडा, विहीगांव, दहीगांव रेचा, लखाळ, भंडारज, कोकर्डा इतयाची गावांचा समावेश पाहणी दौऱ्यामध्ये होता.
यावेळी अजय देशमुख, अमोल कोरडे, किरण श्रीराव, चेतन ठाकरे, मदन बायस्कार, रवि ढोकणे, रवि ठाकुर, विठ्ठल ढोले, अशोक श्रीराव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.



