विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात ओझोन दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात जागतिक ओझोन दिन मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ओझोन थराचे संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण हा मुख्य उद्देश ठेवून जनजागृती, अतिथींची व्याख्याने, विद्याथ्र्यांची भाषणे तसेच आकर्षक पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्रमुख अतिथी म्हणून विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथील रसायनशास्त्राचे प्रा.डॉ. सुरेश उमरे, श्री शिवाजी सायन्स कॉलेज, अमरावतीचे डॉ. प्रशांत आर. मंडलिक, डॉ. जागृती बारब्दे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ. सुरेश उमरे यांनी ओझोन थर संरक्षणात विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका या विषयावर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना ओझोन थराचे रासायनिक व भौतिक महत्त्व विषद केले. ादूषण, औद्योगिक रसायने व मानवाच्या चुकीच्या कृतींमुळे ओझोन थराला होत असलेल्या हानीबाबतही त्यांनी विद्याथ्र्यांना माहिती दिली.
डॉ. प्रशांत आर. मंडलिक यांनी आपल्या भाषणात विद्याथ्र्यांना संशोधनाच्या संधी, ओझोन संरक्षणासाठी नवीन शास्त्रीय उपायांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणातून कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी ओझोनचे महत्व सांगतांना पृथ्वीचे संरक्षण आपल्याला करावयाचे आहे व त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले. रसायनशास्त्र मंडळाच्या अध्यक्ष प्रांजली चव्हाण यांनीही यावेळी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. तर विभागातील विद्यार्थीनी कु. चैताली नवघरे, कु. गायत्री निवळ, कु. कोमल भलटाक यांनीही ओझोन संरक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
पोस्टर स्पर्धेत विद्याथ्र्यांनी पर्यावरणविषयक जागरूकता आणि वैज्ञानिक सर्जनशीलतेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. स्पर्धेचे परीक्षण श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या डॉ. योगिता ठाकरे, व चांदुरबाजार येथील टोम्पे महाविद्यालयाचे डॉ. नंदकिशोर गव्हाळे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. मनिषा कोडापे, आभाक पूजा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला अधिसभा सदस्य डॉ. जयंत वडतकर, श्री सातव, श्रीमती बैस, श्री व्यवहारे, डॉ. प्रज्ञा नांदुरकर, डॉ.स्वाती गडाखे, कु. जाधव, सौ. ठाकरे, आरती कुंभारे, वैष्णवी बंड, स्मिता नंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विभागाच्या विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले.



