Latest NewsMaharashtra

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस

मुंबई : राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे, तर बीड २४ मिमी, जालना १३.९ मिमी, सोलापूर १२.१ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज ३० मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :

रायगड ०.३, रत्नागिरी ३.९,  सिंधुदुर्ग ११.२,  पालघर ०.१, नाशिक ०.६, धुळे ०.४,  जळगाव ०.१, अहिल्यानगर ०.५, सोलापूर १२.१,  सातारा १,  सांगली ०.९,  कोल्हापूर ०.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना १३.९, बीड २४, लातूर ५.१,  धाराशिव ४२.२, नांदेड ९.३,  परभणी ३,  हिंगोली ०.२, बुलढाणा २.२, अकोला ०.१, वाशिम ०.२, अमरावती ३.४, यवतमाळ ६.५,  वर्धा ८.७, नागपूर १.४, भंडारा ०.७, गोंदिया ३.९, चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली २.५.

धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले. मात्र, पावसामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button