citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची कारवाई; १६.९४ ग्रॅम एमडीसदृश्य पावडर जप्त

अस्सी नगर येथील सलीम स्पोर्ट्स ग्राउंड परिसरात संशयित ताब्यात; ड्रग्ज पुरवठा करणारा सोहेल मलिक उर्फ मायाभाई फरार

नागपूर : शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असतानाच अस्सी नगर परिसरात पोलिसांच्या तपास पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १६.९४ ग्रॅम एमडीसदृश्य पावडर जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपास पथकातील एएसआय पवारे हे पेट्रोलिंग करीत असताना अस्सी नगर येथील सलीम स्पोर्ट्स ग्राउंड परिसरात त्यांना एक संशयित इसम आढळून आला. त्याची चौकशी आणि अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ १६.९४ ग्रॅम एमडीसदृश्य पावडर मिळून आली.

या पावडरबाबत विचारणा केली असता, संबंधित इसमाने ती सोहेल मलिक उर्फ मायाभाई याच्याकडून आणल्याचे सांगितल्याची माहिती आहे. यानंतर पोलिसांनी साहिल अहमद फहीम उद्दीन मलिक याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सोहेल मलिक उर्फ मायाभाई हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. जप्त करण्यात आलेली पावडर एमडी ड्रग्ज असल्याची अधिकृत पुष्टी तपासणीनंतर होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button