अमरावती महानगरपालिकेत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण; पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती
अमरावती (प्रतिनिधी) : आदिवासी समाजाचे महानायक आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेत साजरी करण्यात आली.

या निमित्ताने महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सभागृह नेते चेतन गावंडे, नगरसेवक मिलिंद बांबल, मनीष बजाज, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, प्रमोद मोहोड, विनोद गोडबोले, गणेश काकडे, सतीश ताथोड यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याचे आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले.



