citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurPolice

नागपूरच्या ट्रॅफिकवर DCP ॲक्शन मोडमध्ये!

‘ऑपरेशन नो रॉंग साईड’नंतर आता सिग्नल आणि वाहतूक कोंडीवरही ठोस निर्णय

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रॉंग साईड वाहनचालक आणि सिग्नल व्यवस्थेतील अडचणी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पोलीस उपायुक्त वाहतूक श्री. आदित्य मिरखेलकर यांच्याशी सिटी न्यूजने 1 to 1 संवाद साधला. यावेळी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली.

रॉंग साईड वाहनचालकांवर ‘ऑपरेशन नो रॉंग साईड’

नागपूर शहरात वाहतुकीचे नियम मोडून रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्यांविरोधात ‘ऑपरेशन नो रॉंग साईड’ सुरू करण्यात आले आहे. रॉंग साईडमुळे अपघाताचा धोका वाढण्यासोबतच वाहतुकीची शिस्तही बिघडते. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.

सिग्नल बंद असल्यास वाहतूक कशी नियंत्रित करणार?

शहरातील काही भागांमध्ये सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. सिग्नल बंद असताना वाहतूक नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना केली जाते आणि अशा ठिकाणी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई कशी केली जाते, हा मुद्दाही DCP आदित्य मिरखेलकर यांच्यासमोर मांडण्यात आला.

होमगार्डच्या तैनातीचा मुद्दाही चर्चेत

वाहतूक नियंत्रणासाठी विविध ठिकाणी होमगार्डची तैनाती करण्यात येते. मात्र, महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक पोलिसांची उपस्थिती आणि मनुष्यबळाचे योग्य नियोजन कसे केले जाईल, याबाबतही संवाद साधण्यात आला.

मेडिकल स्क्वेअरमधील कोंडीवर ठोस उपाययोजना

नागपूरच्या मेडिकल स्क्वेअर परिसरातील वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी सातत्याने अडचणीचा विषय ठरत आहे. या भागातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

या सर्व प्रश्नांवर लवकरच ठोस निर्णय घेण्याचा सकारात्मक प्रतिसाद DCP आदित्य मिरखेलकर यांनी दिला.

नागपूर शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी रॉंग साईड वाहनचालकांवरील कारवाईसोबतच सिग्नल व्यवस्था, मनुष्यबळ आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणी विशेष उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.

सिटी न्यूजचा हा विशेष 1 to 1 संवाद — नागपूरच्या ट्रॅफिक प्रश्नांवर DCP आदित्य मिरखेलकर ॲक्शन मोडमध्ये!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button