citynewsIndia NewsInternational NewsLatest News

भारताकडून श्रीलंकेला 38 हजार मेट्रिक टन इंधन पुरवठा; ऊर्जा सहकार्याला नवी गती

नवी दिल्ली/कोलंबो (प्रतिनिधी):
भारताने श्रीलंकेला मदतीचा हात देत 38,000 मेट्रिक टन (एमटी) पेट्रोलियम इंधनाचा पुरवठा केला आहे. यामध्ये 20,000 एमटी डिझेल आणि 18,000 एमटी पेट्रोलचा समावेश असल्याची माहिती कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तालयाने दिली.

पश्चिम आशियातील युद्धस्थिती आणि ऊर्जा सहकार्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुर कुमार डिसानायके यांच्यात नुकतीच दूरध्वनीवर चर्चा झाली होती. या चर्चेनंतर भारताने हा इंधन पुरवठा करत श्रीलंकेला महत्त्वपूर्ण मदत केली आहे.

दरम्यान, 23 मार्च 2026 रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांच्यातही दूरध्वनीवर संवाद झाला होता, अशी माहिती उच्चायुक्तालयाने दिली.

या पावलामुळे भारत-श्रीलंका ऊर्जा सहकार्याला अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आर्थिक अडचणीत असलेल्या श्रीलंकेसाठी हा पुरवठा दिलासादायक ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button