Accident NewsIndia NewsLatest News

प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज कोसळले; 20 जण ढिगाऱ्याखाली, बचावकार्य युद्धपातळीवर

प्रयागराज येथे एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका कोल्ड स्टोरेज इमारतीचे छत अचानक कोसळल्याने मोठा अपघात झाला असून, सुमारे 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कोल्ड स्टोरेजमध्ये दररोज 100 हून अधिक कामगार काम करत होते. अचानक छत कोसळल्याने आत काम करणाऱ्या अनेक कामगारांना पळण्याची संधीही मिळाली नाही. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच SDRF आणि अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, घटनास्थळावरून अमोनिया वायूची गळती झाल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत असून, स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

या कोल्ड स्टोरेजचा संबंध समाजवादी पक्षाचे माजी आमदार अन्सार अहमद यांच्याशी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये घटनास्थळी गोंधळाचे वातावरण दिसत असून, नागरिक जखमींना वाचवण्यासाठी धावपळ करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

👉 प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button