नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला पंजाबमधून अटक

नागपूर शहरातील यशोधर नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला थेट पंजाब मधून अटक केली आहे.
फिर्यादी हरजिंदर सिंग हरचरण सिंग संदूक (वय ५४) यांनी टेकानाका परिसरातील Kapil Nagar Police Station येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे यशोधर नगर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी नवदीप सिंग उर्फ गोत्रा हा पंजाबमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार यशोधर नगर पोलिसांनी विशेष पथक पंजाबला पाठवले. पथकाने आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेत अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी (PCR) सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या कारवाईत यशोधर नगर पोलिस ठाण्याच्या एपीआय आणि पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या संपूर्ण कारवाईस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
नागपूर पोलिसांनी पंजाबपर्यंत पाठलाग करून आरोपीला अटक केल्याने ही मोठी कामगिरी मानली जात आहे.



