citynewsIndia NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminSocial News

हुडकेश्वरमध्ये घरफोडी; रोख रक्कम, दागिने आणि दुचाकीसह ७ लाखांहून अधिक ऐवज लंपास

नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात घरफोडीची घटना समोर आली असून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने आणि दुचाकीसह लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीदास भरतदास वेणव (वय ३५) हे विनायक नगर, गजानन मंदिरामागे, म्हाळगी नगर परिसरात राहतात. ९ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजता ते कुटुंबासह घराला कुलूप लावून विजय नगर येथील कळमणा मार्केटमध्ये गेले होते.

याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूममधील आलमारीत ठेवलेली ११ हजार रुपयांची रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने तसेच होंडा अॅक्टिवा दुचाकी असा एकूण सुमारे ७ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच पीडित व्यक्तीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button