Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

बडनेऱ्यात घरगुती गॅस सिलेंडर वितरणात विलंब; नागरिकांचा संताप

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहर आणि परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे. बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर गर्दी करत नाराजी व्यक्त केली.

बडनेरा शहरासह परिसरातील जवळपास ५० गावांना गॅस पुरवठा करण्याची जबाबदारी ‘मंगलम भारत गॅस एजन्सी’कडे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बुकिंग करूनही ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

नियमांनुसार ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर एक ते तीन दिवसांत सिलेंडर मिळणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करण्यास सांगितले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एजन्सीसमोर गर्दी करत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस प्लांटवरून सिलेंडरचा साठा उशिरा मिळत असल्यामुळे वितरणात विलंब होत आहे.

गॅस पुरवठा अनियमित झाल्यामुळे घरगुती गॅसवर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी शासनाने गॅस पुरवठा साखळी मजबूत करून वितरण व्यवस्था नियमित करण्याची मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button