AmravatiLatest NewsSports

अमरावती : शिवदौड मॅरेथॉन उत्साहात संपन्न; शेकडो स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त अमरावतीत आयोजित करण्यात आलेली शिवदौड मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विविध वयोगटातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

१९ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले होते, तर उद्घाटक म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते उपस्थित होते.

यावेळी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी, प्रा. सुभाष बनसोड तसेच डॉ. अशोक घोगरे, डॉ. विधळे आणि डॉ. पेंढारकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्पर्धेची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली आणि समारोप देखील त्याच ठिकाणी झाला. १९ वर्षांखालील मुले-मुली, १४ वर्षांखालील गट तसेच ४५ वर्षांवरील पुरुष आणि ४० वर्षांवरील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

स्पर्धेसाठी १०, ५ आणि ३ किलोमीटर अशी अंतरं निश्चित करण्यात आली होती. स्पर्धकांनी जिद्द आणि चिकाटीने धाव पूर्ण करत क्रीडास्पर्धेचा आनंद लुटला.

सकाळी आठ वाजता पार पडलेल्या समारोप व बक्षीस वितरण समारंभाला हेमंतराव काळमेघ, अतिरिक्त आयुक्त सुरज वाघमारे, अमरावती मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि प्रा. प्रकाश देशमुख उपस्थित होते. प्रत्येक गटातील प्रथम ते सहाव्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, सहभाग प्रमाणपत्र, मेडल आणि अल्पोपहार देण्यात आला.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत युवकांना क्रीडा, शिस्त आणि आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, डॉ. उल्हास देशमुख, डॉ. अतुल पाटील, डॉ. पुष्पलता देशमुख तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा संचालक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button