AmravatiCity CrimeCrime NewsLatest News

अमरावती : मध्यरात्री गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२ ग्रॅम एमडी ड्रग्ससह आरोपी ताब्यात

अमरावती शहरातून अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई समोर आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री विशेष मोहीम राबवत एमडी ड्रग्ससह एका आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास शहर गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने कोतवाली परिसरातील हॉटेल आदर्श देशी विलायती जवळ सापळा रचला.

या सापळ्यात सय्यद नाजीम सय्यद कासिम (वय ३५ वर्ष, रा. मसानगंज, अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान आरोपीकडून सुमारे १२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.

या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे ड्रग्स तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button