AmravatiLatest NewsSocial News

अमरावती मध्ये उद्या ‘शिवमहोत्सव २०२६’; भव्य मिरवणूक, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उद्या दि. १९ फेब्रुवारी रोजी शहरात भव्य ‘शिवमहोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. Sipna College of Engineering and Technology येथे आयोजित पत्रकार परिषदेत या महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सिपना संस्थेच्या वतीने ‘सिपना शिवमहोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त काढण्यात येणारी भव्य मिरवणूक सायन्सस्कोर शाळेच्या प्रांगणातून प्रारंभ होऊन शिवटेकडी, गल्से हायस्कूल चौक, गणेशदास राठी चौक, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, राजापेठ मार्गे सिपना कॉलेजपर्यंत पोहोचणार आहे. मिरवणुकीत बुलेटस्वार मुली व झेंडेधारी मावळे हे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. जिपवर मा. श्री. जगदीश भाऊ गुप्ता उपस्थित राहणार आहेत.

मिरवणुकीदरम्यान शिवाजी महाराजांच्या वेशात मेहरदीप पारखे, जिजाऊंच्या भूमिकेत कु. ईशा डंबाले तर सईबाईंच्या भूमिकेत कु. उन्नती चौधरी सहभागी होणार आहेत. राजकमल चौक येथे ढोल पथक वादन, फ्लॅश मॉब तसेच लाठी-काठीचे विशेष प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.

महाविद्यालय परिसरात शिवाजी महाराज व Sambhaji Maharaj यांच्या प्रतिकृतींसह देखावा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, महाविद्यालयातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे.

विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा. गजानन देशमुख, Shivaji University यांचे “मी रायगड बोलतोय” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच कु. अदिती बोरेकर दिग्दर्शित ‘शिव गर्जना’ हे नाट्य सादरीकरणही सादर केले जाणार आहे.

पत्रकार परिषदेस संस्थेचे उपाध्यक्ष अजयभाई श्रॉफ, प्राचार्य डॉ. संजय खैरडे तसेच आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button