Crime NewsLatest NewsMaharashtra

मुंबईतील सांताक्रूझमध्ये घरगुती नोकराकडून देवघरातील चांदीच्या मूर्तींची चोरी; महिनाभरानंतर आरोपी अटकेत

मुंबईतील मुंबई शहरात पुन्हा एकदा घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांताक्रूझ परिसरातील जुहू-कोळीवाडा भागात घरातील देवघर फोडून चांदीच्या मूर्ती आणि पूजेचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी घरगडीचाच हात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याचे नाव शिवरंजन जगलाल असे आहे.

घरगडीच निघाला चोर

तक्रारदार श्रीय कोडिया या आपल्या पती निपुण आणि मुलगी श्रेणिका यांच्यासह विश्रांती अपार्टमेंट, जुहू-कोळीवाडा येथे राहतात. 2023 पासून शिकुमार नावाचा नोकर त्यांच्या घरी काम करत होता. नोव्हेंबर 2025 मध्ये त्याने नोकरी सोडल्यानंतर त्याच्या शिफारशीवरून शिवरंजन याला घरकामासाठी ठेवण्यात आले होते.

दरम्यान, 10 जानेवारी रोजी सकाळी श्रीय उठल्यानंतर शिवरंजन घरात दिसला नाही. संशय आल्याने त्यांनी देवघर तपासले असता चांदीच्या सर्व मूर्ती आणि पूजेचे साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आले.

चार लाखांचा मुद्देमाल लंपास

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये मोठी व लहान आकाराच्या चांदीच्या दोन थाळ्या, चार वाट्या, तीन पळ्या, एक कलश, घंटा, त्रिशूल तसेच गणेश, लक्ष्मी आणि कार्तिकेय यांच्या चांदीच्या मूर्तींचा समावेश आहे. एकूण सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला असल्याचे सांगण्यात आले आहे.

महिनाभरानंतर आरोपी जेरबंद

या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी फरार असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढत अखेर त्याला अटक केली.

आरोपीला बांद्रा न्यायालय येथे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घरगड्यांची नेमणूक करताना अधिक दक्षता घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button