Latest NewsMaharashtra

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी; जानेवारीचा हप्ता कधी येणार?

छत्रपती संभाजीनगर: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांचे अर्ज ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत अडकले होते किंवा चुकीच्या माहितीमुळे ज्यांना पैसे मिळाले नव्हते, त्यांच्यासाठी आता पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे हजारो महिलांना दिलासा मिळाला असून ३१ मार्चपर्यंत ही दुरुस्ती करता येणार आहे.

नेमका पेच काय होता?

डिसेंबर २०२५ पर्यंत अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, आधार प्रमाणीकरण करताना ‘कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन धारक आहे का?’ या पर्यायावर अनेकांनी चुकून ‘हो’ असे क्लिक केले होते. योजनेच्या अटींनुसार असा सदस्य असल्यास महिला अपात्र ठरते. या एका तांत्रिक चुकीमुळे पात्र असूनही हजारो महिलांचे १५०० रुपये रखडले होते.

आता काय बदल झाला? (महत्त्वाचे अपडेट्स)

महिला व बालविकास विभागाने क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची पुन्हा संधी दिली आहे:

  • दुरुस्तीची मुदत: ३१ मार्च २०२६ पर्यंत महिला आपला अर्ज पुन्हा दुरुस्त करू शकतील.
  • फिजिकल व्हेरिफिकेशन: ज्या अर्जांबाबत संभ्रम आहे, त्यांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • पोर्टल अपडेट: आजपासून ई-केवायसी पोर्टल सक्रिय झाले असून, महिला आपल्या जवळच्या सेतू केंद्र किंवा मोबाईल ॲपवरून ही दुरुस्ती करू शकतात.

जानेवारीचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

बऱ्याच लाभार्थी महिलांना आता प्रतीक्षा आहे ती जानेवारीच्या हप्त्याची. डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर १४ जानेवारी दरम्यान जमा झाला होता.

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जानेवारीचा हप्ता बँक खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे.
  • तांत्रिक दुरुस्ती सुरू असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये हा हप्ता उशिरा मिळू शकतो, परंतु पात्र महिलांना मागील थकबाकीसह पैसे दिले जातील.

रक्कम वाढणार का? २१०० रुपयांचे काय झाले?

निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या आश्वासनाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सध्या तरी महिलांना १५०० रुपयेच मिळत असून, वाढीव रकमेबाबत अद्याप कोणताही अधिकृत शासन निर्णय (GR) निघालेला नाही

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button