AmravatiLatest NewsSports

विद्यापीठाच्या पदव्युत्तर शारीरिर शिक्षण विभागात आंतर विभागीय क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन

अमरावती (दि. 06.02.2026) :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने आंतर विभागीय क्रिकेट सामन्यांचे 5 ते 7 फेब्राुवारी दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले आहे. सामन्यांचे उद्घाटन प्रसंगी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे,  प्रमुख अतिथी म्हणून डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचे डॉ. दिनानाथ नवाथे, असोसिएट एलएनआयपीई, ग्वालियरचे डॉ. दिलीप तुरकी उपस्थित होते.
               याप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. सुभाष गावंडे म्हणाले, आजची पिढी मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक असून विद्याथ्र्यांना महाविद्यालयीन जीवनातील परिश्रम पुढील आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतात.
               प्रमुख अतिथी डॉ. दीनानाथ नवाथे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवांचे दाखले दिले. जेव्हा स्मृती मंधानासारखे खेळाडू बाद होतात, तेव्हा त्या आपल्या चुका सुधारण्यासाठी स्वत:चे व्हीडीओ हजारो वेळा पाहतात. खेळात यश मिळविण्यासाठी अशाच चिकाटीची आणि सूक्ष्म अभ्यासाची गरज असे, असे सांगितले.0 डॉ. दिलीप तुरकी यांनी फिटनेसचे महत्त्व पटवून देतांना जर तुम्ही शारीरिकदृष्ट¬ा तंदुरुस्त असाल, तर तुम्ही तरूण दिसाल. शारीरित क्षमता टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनी मार्गदर्शन करतांना विद्याथ्र्यांनी खेळामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. खेळासाठी वय हा फक्त आकडा आहे, असे त्या म्हणाल्या.
                सूत्रसंचालन सुरभी डोंगरे व लोंगशिथुंग यांनी, तर आभार लोंगशिथुंग यांनी मानले. निखील कुमार यांनी मानले. सामन्यांच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अतुल बिजवे, डॉ. विजय निमकर, कु. सविता बावनथडे, डॉ. निलेश इंगोले, डॉ. सौरभ त्रिपाठी, विभागातील शिक्षक परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button