Crime NewsLatest NewsPune

पुण्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; एक महिला अटकेत, दोन पीडितांची सुटका

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने (AHTC) केलेल्या कारवाईत एका महिलेच्या अड्ड्यावर छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे उत्तमनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने दोन गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले. त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांवर ती आपली उपजीविका चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गौरी विकास पवळे (वय ४५, रा. बधे कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) असे आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार वैशाली खेडेकर यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी स. नं. २८०, फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, योगीराज कॉम्प्लेक्स, सरस्वती नगर, उत्तमनगर येथे छापा टाकला.

या कारवाईत दोन पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून आरोपी महिलेविरुद्ध कलम १४३(३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम (PITA) कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button