Accident NewsJalgaonLatest News

पाचोरा–जळगाव मार्गावर भीषण अपघात; दोन तरुण ठार, पाच गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. पाचोरा–जळगाव मार्गावरील एका हॉटेलजवळ सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने आसनखेडा येथे सामाजिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना भरधाव वेगातील कारवरील चालकाचा ताबा सुटला. कार रस्त्याच्या कडेला जोरदार आदळून दोन ते तीन वेळा पलटी झाली.

या अपघातात श्रीरंग सुरेश पाटील आणि प्रसन्न रवींद्र निमजे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा एक चक्का तुटून पडला आणि रस्त्यालगतचा महावितरणचा विजेचा खांबही कोसळला.

जखमी पाच जणांना तातडीने पाचोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन बाजूला हटवण्यात आले. या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटण्याचे कारण आणि इतर तांत्रिक बाबींचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button