गुढे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवाला मेट्रोतील प्रवास

मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, भातकुली चा स्तुत्य उपक्रम
भातकुली : – मातोश्री बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, अमरावती द्वारा संचालित मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, भातकुली येथील आश्रमशाळेत मेळघाट सारख्या आदिवासी बहुल भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मेळघाट सारख्या अति दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी असल्यामुळे त्यांना धारणी शिवाय कोणतेच मोठे शहर पाहण्याची संधी उपलब्ध होत नाही.
आदिवासी विद्यार्थांना आश्रमशाळेच्या बाहेरची दुनिया दाखविण्याची कल्पना मातोश्री बहुउदेशीय शैक्षणिक संस्था, अमरावतीचे अध्यक्ष तथा माजी खासदार अनंतराव गुढे यांना सुचली व त्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी सहल नेण्याचे ठरविले व सहलीचा संपूर्ण खर्च देखील सुद्धा त्यांनी उचलला, त्यामुळे विद्यार्थ्यांची सहल सुखद झाली.
आश्रमशाळेतील वर्ग ७ ते १० वी वर्गातील सुमारे विद्यार्थांनी या सहलीचा आनंद घेतला. सहलीची सुरुवात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ३ बसेसच्या समोर नारळ व पुष्पहार घालून पूजनाने झाली .
सहलीमध्ये प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तदनंतर नागपूर येथील प्रसिद्ध असलेले रमण सायन्स सेंटर, दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर रहाटे चौक ते एयरपोर्ट या दरम्यान सहलीचा पूर्ण विद्यार्थ्यानी नागपूर मेट्रो चा प्रवास करून आनंद घेतला. इतकेच नव्हे तर आदिवासी बहुल भागात राहणाऱ्या या आदिवासी विद्यार्थांनी शाळेतील सचिन अंजीकर यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिले, त्यावेळी यांचा आनंद गगनाला भिडताना दिसून आला. त्यांनतर त्यांना कोराडी येथील देवीचे दर्शन करून भातकुली येथे पोहचले.
सहलीची जबाबदारी शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रवीण जायदे, नरेश विल्हेकर, ललिता कवडेती, कीर्ती पाटील, सचिन अंजीकर, सुशांत गुढे, बाबाराव वावगे, प्रतिभा वानखडे, ऋतुजा काळे यांनी व्यवस्थित रित्या पार पाडल्यामुळे शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. संगीता शिंदे (बोंडे) यांनी सर्वाचे आभार मानले व कौतुक केले आहे. आश्रमशालेच्या या सहलीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



