AmravatiLatest News

श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त शंकर नगर, खामगाव येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री संत गजानन महाराज मंदिराचा २५ वा रौप्य महोत्सवी वर्ष

खामगांव :- श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, खामगांव यांच्या वतीने शंकर नगर (यशोधरा नगर), खामगांव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मंदिर प्रांगणात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी कलश पूजन व वीणा प्रारंभाने होणार असून त्याच दिवशीपासून श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथा रविवार दि. ०१ फेब्रुवारी ते शुक्रवार दि. ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भजनाचा कार्यक्रम होणार असून दुर्गा सप्तपदी महिला मंडळ, यशोधरा नगर तसेच महालक्ष्मी भजन मंडळ, गजानन कॉलनी हे भजन सादर करणार आहेत. निर्माणाधीन मंदिरातील माँ दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूर्णाहुती शुक्रवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता काल्याचे कीर्तन ह.भ.प. महादेव महाराज, पोरज यांच्या वाणीतून होणार असून त्याच दिवशी दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात दररोज सायंकाळी ८ वाजता कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. भारतीताई गजानन धोटे (पारखेड), सोमवार दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. पवन महाराज चहाटे (अंजनगांव सुर्जी), मंगळवार दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. पंढरी महाराज डिघोळे (जवळा बु.), बुधवार दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. ज्योतीताई रमेश काळे (शिंगाळे), खामगांव, गुरुवार दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. कैलास महाराज मोरखडे (अटाळी) तसेच शुक्रवार दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. नाना महाराज पजई (खामगांव) हे कीर्तनकार आपले कीर्तन सादर करणार आहेत. या कीर्तन कार्यक्रमांना आचार्य ह.भ.प. महादेव महाराज (घोरज) यांचे मार्गदर्शन लाभणार असून गायनाचार्य म्हणून ह.भ.प. श्रीराम महाराज अंजनसांडे व ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वरखेडे तसेच मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प. सोपान महाराज अंजनसांडे सहभागी होणार आहेत. उत्सव काळात दररोज सकाळी ५ वाजता काकडा ह.भ.प. मोतीराम महाराज, गवंढळा व ह.भ.प. शिंदे महाराज, पिंप्री यांच्या वाणीतून होणार असून दररोज सायंकाळी ६ वाजता हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी भक्तिभावाने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, खामगांव, शंकर नगर (यशोधरा नगर), खामगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button