AmravatiEducation NewsLatest News

विद्याथ्र्यांनो, जास्तीत जास्त स्टार्टअप करा – कुलगुरू…. विद्यापीठात स्टार्टअप एक्सपो – 2026 चे उद्घाटन

अमरावती (दि. 30.01.2026) – आजच्या युगात तंत्रज्ञान झपाट¬ाने बदलत आहे. या बदलत्या प्रवाहाची जाणीव ठेवून विद्याथ्र्यांनी आपल्या संशोधनाची दिशा ठरवावी आणि जास्तीत जास्त स्टार्टअप करावे. विद्यापीठाच्यावतीने आपल्याला सर्व प्रकारचे मार्गदर्शन व सीड फंड दिला जाईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ व विद्यापीठातील संशोधन आणि इन्क्युबेशन केंद्राच्यावतीने व्दिदिवसीय स्टार्टअप एक्सपो – 2026 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर स्टार्टअप मेंटल इन्वेस्टर आणि थॉट लीडर तसेच लेमन आयडिया इकोसिस्टीमचे फाऊंडर अॅन्ड चीफ आयडिया फार्मर श्री दीपक मेनारीया, सेंट व्हिन्सेंट पलोट्टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, नागपूरच्या सीएसई विभागाचे प्रमुख डॉ. मनोज ब्राम्हे, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील उपस्थित होते.
               कुलगुरू डॉ. मिलींद  बारहाते यांनी स्टार्टअप एक्सपो प्रदर्शनीचे फीत कापून उद्घाटन केले. मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, देशातील एकूण स्टार्टअप पैकी 48 टक्के स्टार्टप्समध्ये महिलांचा सक्रिय सहभाग आहे, ही बाब महिला सक्षमीकरणासाठी मोठी साक्ष आहे. भारतीय तरुण संशोधनात आघाडीवर असून ग्लोबल इन्नोव्हेशन इंडेक्समध्ये भारताने 48 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला इन्नोव्हशन स्टार्टअप इंटरप्रीनियरशिप आणि संशोधन हा मंत्र देशाच्या प्रगतीचा कणा आहे. स्टार्टअप केवळ शहरापुरते मर्यादित नसून ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ¬ा संख्येने स्टार्टअपमध्ये सहभागी होत आहे. बदलत्या काळानुसार विद्याथ्र्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बायोटेक आणि स्पेस टेक्नॉलॉजी यासारख्या आधुनिक विषयांवर लक्ष केंद्रित करावे. कुठलाही न्यूनगंड न बाळगता आपल्या सभोवतालच्या सामाजिक गरजा ओळखाव्या आणि त्यातून सेवाभावी स्टार्टअपची निर्मिती करावी. विद्याथ्र्यांना नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विद्यापीठ सीड फंड पुरवित असून स्टार्टअपसाठी उत्तम प्लॅटफॉर्म विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहे. अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे न बनता भविष्यात यशस्वी उद्योजक होतील, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
                 श्री दीपक मेनारीया म्हणाले, स्टार्टअप सुरू करण्यासाठी वय किंवा परीक्षेत मिळणारे गुण यांचा कोणताही संबंध नाही. अगदी सहा वर्षाच्या मुलांपासून ते 78 वर्षाच्या वृध्दांपर्यंत कोणीही आपल्या कल्पनेने स्टार्टअप सुरू करू शकतो कृषी, पर्यावरण, उद्योग, मेडिकल, हर्बल प्रॉडक्ट्स आणि आयुर्वेद यासारख्या वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये स्टार्टअपच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. संस्कृती आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी कल्चर टेक ही नवी संकल्पना उदयास येत असून या क्षेत्रातही स्टार्टअपसाठी मोठा वाव असल्याचे ते म्हणाले. स्टार्टअप केवळ पैसा कमविण्यासाठी नसून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. स्टार्टअप करणारा विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहून अनेकांना नोक-या देणारा जॉब क्रियेटर बनतो. विद्याथ्र्यांनी आपल्या सभोवतालच्या समस्यांचे बारकाईने निरीक्षण करून त्यावर आधारित उपाय शोधून स्टार्टअपच्या माध्यमातून सामाजिक योगदान द्यावे, स्टार्टअप सुरू करण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना उपलब्ध आहेत, त्याचा लाभ विद्याथ्र्यांनी घ्यावा आणि केवळ स्टार्टअपच्या माध्यमातून उत्पादन करणे पुरेसे नाही, तर आपला माल ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवायचा आणि तो कसा विकायचा हे तंत्र सुध्दा आजच्या काळात आत्मसात करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
डॉ. मनोज ब्राम्हे म्हणाले, 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया योजनेमुळे देशात मोठी औद्योगिक क्रांती झाली. संत गाडगे बाबांच्या जनसेवा हीच ईश्वर सेवा या विचारांचा वारसा जपत विद्याथ्र्यांनी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी स्टार्टअप सुरू करावे. आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सेक्युरिटी या विषयांची गरज ओळखून या क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. शेतीमधील कष्टाची कामे कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, ग्रामीण भागात टेलीमेडिसीन सुविधा द्वारे आरोग्यसेवा पोहोचवणे, शासकीय कामात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी स्टार्टअपचा उपयोग करणे आवश्यक आहे. नागपूर हे लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होत असल्याने तेथे सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात स्टार्टअपसाठी प्रचंड वाव आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या स्टार्टअपसाठी अनेक सवलती आणि योजना आहेत. विद्याथ्र्यांनी त्याचा पुढे लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
                    संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्तविक ननसा संचालक डॉ. अजय लाड यांनी, पाहुण्यांचा परिचय इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर यांनी करून दिला. संचालन व आभार डॉ. सुलभा पाटील यांनी केले. कार्यक्रमाला मोठ¬ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button