AmravatiLatest News

गो. से. महाविद्यालयात सौ. श्रद्धाताई बोबडे यांच्या हस्ते ध्वजारोहन

खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन मंगळवार, दि. २६ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.१५ वाजता माननीय सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे (संचालिका, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत सादर करण्यात आले. या समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव उर्फ दादासाहेब बोबडे, उपाध्यक्ष मा. प्रकाशजी तांबट, संस्थेचे सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे, सदस्य अजिंक्य दादा बोबडे, प्रा. डॉ. नंदकिशोर महाले, मा. अशोक सोनोने, श्री. रवी महर्षी, प्रा. डॉ. हेमंत चांडक यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, एन.सी.सी. व एन.एस.एस.चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहनानंतर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. बटालियनकडून प्रमुख पाहुणे माननीय सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे व प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शिस्तबद्ध परेड सादर करत सलामी देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी परेडचे निरीक्षण करून एन.सी.सी. विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या संदेशात माननीय सौ. श्रद्धाताई बोबडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय संविधान हे आपल्याला समानता, स्वातंत्र्य व न्यायाची शिकवण देते. तरुणांनी शिक्षणासोबतच राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी व नैतिक मूल्ये आत्मसात करावीत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणांनी परिसर भारावून गेला. हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button