AmravatiLatest News

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेमुळे भारताचे ऑपरेशन सिंदुर यशस्वी – काशीनाथ देवधर

विद्यापीठात ‘ऑपरेशन सिंदुर आणि आत्मनिर्भर भारत’ विषयावर व्याख्यान संपन्न

अमरावती (दि. 25.01.2026)- 1965 च्या युध्दात भारताला विजय मिळाला असला तरी शस्त्रास्त्र तंत्रज्ञान भारताला विदेशाचे घ्यावे लागले होते, मात्र आता भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत असून स्वदेशी बनावटीचे शस्त्रास्त्र भारत निर्माण करीत आहे. त्यामुळेच भारताला ऑपरेशन सिंदुरमध्ये यश मिळाले, असे प्रतिपादन पुणे येथील डीआरडीओ चे सेवानिवृत्त समूह संचालक श्री काशीनाथ देवधर यांनी केले. 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी विकास आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र सभागृहात आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारमंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, पुणे येथील माजी प्राचार्य तथा नॅक मूल्यांकन समितीचे माजी सदस्य डॉ. नागनाथ धर्माधिकारी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर उपस्थित होते.
               श्री देवधर पुढे म्हणाले, भारतावर आतंकवादी हल्ले झाले, परंतु भारताने नेहमीच शांततेचा मार्ग अवलंबिला आहे. युध्द नको, बुध्द हवा असे भारताने आपले शांततेचे ब्रिाद अवलंबिले आहे. असे असले तरी आमच्या सहनशीलतेचा कोणी अंत पाहू नये, आम्हीही जशास तसे उत्तर देवू असे भारताने जगाला ठणकावले. 2014 नंतर भारताचे चित्र बदलले आणि आतंकवादाविरोधात भारताने  जशास तसे उत्तर दिले. पहेलगाममध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदुर मधून घेतला. भारताच्या या कारवाईमुळे जगातील देशही भारताच्या बाजूने होते. युध्दाच्या वेळी भारताने पाकिस्तानच्या नागरी वस्त्या किंवा लष्कर लक्ष्य न करता पाकिस्तानला नेस्तनाबूत केले. पाकिस्तानचे ड्रोन व मिसाईल हल्ले भारताने परतवून लावले, असेही श्री देवधर यांनी सांगितले.
                पाकिस्तानची सर्वच बाजुने कोंडी झाल्यानंतर पाकिस्तानच्या विनंतीवरुन भारताने युध्द थांबविले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला होता, तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यात जय विज्ञान हा नारा आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय अनुसंधान असा नारा त्यात जोडला. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यामुळे शस्त्रास्त्र तंत्रज्ञानात भारताने केलेल्या मोठ¬ा प्रगतीमुळे भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांना जगात मागणी होत आहे. अत्याधुनिक पध्दतीची शस्त्रास्त्रे भारतीय तंत्रज्ञानाव्दारे आज निर्माण होत आहेत. 2047 पर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल असेही ते म्हणाले.
आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करा – कुलगुरू
                 भारताला आयात अधिक करावी लागत असल्याने आपण आत्मनिर्भर अथवा स्वावलंबी झालो पाहिजे ही संकल्पना पुढे आली. निर्यात कमी आणि आयात जास्त, त्यावर उपाय म्हणून आत्मनिर्भर भारत हा मंत्र केंद्र शासनाने देशाला दिला. स्वावलंबी असणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी तरुण विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी  केले.
                 विद्यापीठामध्ये नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ तसेच इन्क्युबेशन सेंटरव्दारे नवसंशोधकांना सिड फंड देण्यात येते. तरुण विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आपल्यातील नवोपक्रमाच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवाव्या. 2015 मध्ये असलेले 500 स्टार्टअप्स आज दोन लाखांवर गेले आहे. त्यातही 50 टक्के स्टार्टअप्स हे अमरावती व नागपूरमध्ये आहे. विशेषत: यामध्ये ग्रामीण तरुणांचा मोठा सहभाग आहे. विद्यापीठाकडून आयोजित करण्यात येणा-या नवोपक्रम प्रदर्शनीमध्ये सुध्दा बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात. गुजरात येथे झालेल्या रिसर्च कॉन्व्हेंशनमध्ये विद्यापीठाच्या विद्याथ्र्याला अॅनिमल सायन्समध्ये पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांनी भारताचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी याप्रसंगी विद्याथ्र्यांना केले.
                  संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकेतून विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. व्याख्याते श्री काशिनाथ देवधर यांचा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू यांनी परिचय करुन दिला. अमर कतोरे या विद्याथ्र्याने देशभक्ती गीत सादर केले. सूत्रसंचालन श्री किनाके यांनी, तर आभार प्रा. अरविंद तट्टे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध प्राधिकारिणींचे सन्माननीय सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. कु. मंजरी बहादुरे या विद्यार्थीनीने गायिलेल्या वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button