AmravatiLatest NewsSocial News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी अजिंक्य पोटे यांनी पश्चिम विभागीय अन्वेषण स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक

अमरावती (दि. 25.01.2026) –  अखिल भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली अंतर्गत पश्चिम विभागीय संशोधन महोत्सव “अन्वेषण-2026” स्पर्धा सरदार पटेल विद्यापीठ, आनंद, गुजरात येथे नुकतीच संपन्न झाली. या संशोधन महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे सहा संशोधक विद्याथ्र्यांची चमू सहभागी झाली होती.  पश्चिम विभागांतर्गत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, छत्तीसगड व झारखंड या राज्यांमधील विविध विद्यापीठांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत श्री. अजिंक्य पोटे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

               या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता विद्यापीठाच्या आविष्कार चमूमधील उत्कृष्ट सहा प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. सदर निवड करण्यासाठी मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांचे नेतृत्वात नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ अजय लाड, डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. मनिषा कोडापे यांच्या समितीतर्फे चमूची निवड करण्यात आली होती.  निवड झालेल्या सहा प्रकल्पांत विज्ञान गटात विश्वानंद कैलास इधोळे, अभियांत्रिकी व तांत्रिक गटात सय्यद गाउस इब्राहिम, आरोग्य विज्ञान गटात कु. रेणुका सुभाष येंडे, कृषी विज्ञान गटात अजिंक्य कैलास पोटे, समाज विज्ञान गटात संकल्प शैलेन्द्र कोरडे, तर आंतरशाखा गटात राजकुमार गोवर्धनदास जिवताणी यांचा समावेश असलेली चमू या महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नेतृत्व करण्यासाठी सहभागी झाले होते.  

               अन्वेषण पश्चिम विभाग संशोधन महोत्सवात श्री. अजिंक्य पोटे यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.  या स्पर्धेतील कृषी विज्ञान (अॅग्रिकल्चरल सायन्सेस) गटात त्यांनी उत्कृष्ट संशोधन सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या संशोधन प्रकल्पाचे परीक्षक समितीने यावेळी विशेष कौतुक केले.  राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा येथील पीएच.डी. संशोधक असलेले श्री. अजिंक्य पोटे यांनी पश्चिम विभाग अन्वेषण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले आहे.

                श्री अजिंक्य पोटे यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आविष्कार सेलेच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्यात. या स्पर्धेतील यशामुळे श्री. अजिंक्य पोटे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘अन्वेषण 2026’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  सदर स्पर्धा शूलिनी विद्यापीठ, सोलन (हिमाचल प्रदेश) येथे आयोजित करण्यात येणार असून श्री. अजिंक्य पोटे दि. 24 व 25 फेब्रावारी, 2026 रोजी या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button