AmravatiLatest NewsSocial News

आम्हाला घडविण्यामध्ये अमरावती विद्यापीठाचे मोठे योगदान – डॉ. सुशील खोजरे .. विद्यापीठात ऋणानुबंध भव्य माजी विद्यार्थी मिळाव्याचे आयोजन

अमरावती – पश्चिम विदर्भासारख्या मागास भागात विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विद्यापीठाने आम्हा सर्व माजी विद्याथ्र्यांच्या ज्ञानार्जनाचे कार्य करुन मोठे केले आणि त्यामुळेच आम्ही देशातच नव्हे, तर जगातल्या नामांकित संस्थांमध्ये मोठ¬ा पदांवर कार्यरत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत फिडेलिटी इन्व्हेसमेंट, नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका येथील वरीष्ठ व्यवस्थापक डॉ. सुशील खोजरे यांनी व्यक्त केले.  विद्यापीठाच्यावतीने ऋणानुबंध जोपासण्यासाठी भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.  व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, अल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गावंडे, उपाध्यक्ष डॉ. स्वाती शेरेकर, माजी प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके, भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. श्रीनिवास ओमनवार, यांचेसह विविध क्षेत्रात मोठ¬ा पदांवर कार्यरत माजी विद्यार्थी उपस्थित होते.

                   डॉ. खोजरे पुढे म्हणाले, आयोजित माजी विद्यार्थी मेळावा हा खरोखरच ऋणानुबंध आहे.  1998 ला विद्यापीठातून एम.सी.ए. पूर्ण केल्यानंतर आम्ही पहिल्या बॅचचे पाच विद्यार्थी अमेरिकेला गेलो आणि त्याठिकाणी नोकरीला लागलो.  उपस्थित सर्व माजी विद्याथ्र्यांनी विद्यापीठाने त्यांना जे ज्ञानार्जन केले, शैक्षणिकदृष्ट¬ा सक्षम केले, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले, त्यामुळेच सर्व माजी विद्यार्थी यशस्वी मार्गावर पोहचू शकले.  त्यांना आलेले अनुभव याठिकाणी त्यांनी सांगितले आहेत.  विद्यापीठाने यानिमित्ताने एक चांगले व्यासपीठ आम्हा सर्वांना उपलब्ध करुन दिले, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.

                   ते पुढे म्हणाले, आज ए.आय. मुळे जॉब जातो, हे म्हणणे चुकीचे आहे.  ए.आय. मुळे कार्यक्षमता वाढली असून प्रत्येक कार्य गतिमानतेने करता येते.  प्रत्येक क्षेत्रात ए.आय. चा वापर होत असून येणारा काळ हा ए.आय. चाच आहे, हे युवकांनी लक्षात घ्यावे.  तीन हजार कर्मचारी असलेल्या कंपनीमध्ये मी वरीष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असल्यामुळे तुम्हाला सांगतो की, आमच्या कंपनीमध्ये ए.आय. मुळे एकाचाही रोजगार गेलेला नाही.  त्यामुळे ए.आय. ची भिती न बाळगता सातत्यपूर्ण प्रयत्न करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

                   अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, सर्व माजी विद्यार्थी हे विद्यापीठाचे रत्न आहेत.  सहाशेच्या वर माजी विद्याथ्र्यांनी नोंदणी केली असून मोठ¬ा संख्येने याठिकाणी उपस्थित आहेत.  माजी विद्याथ्र्यांशी भावनिक व आत्मिक नाते असल्यामुळे आम्ही ऋणानुबंध ही थीम या कार्यक्रमाकरीता ठेवली.  आमचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठमोठ¬ा पदांवर कार्यरत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.  सर्वच क्षेत्रात आज विद्यापीठाचे नाव आदराने घेतल्या जाते, याचा आम्हाला गौरव वाटतो.

                   नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रॅक्टीकल बेसला व अॅनॅलिटीकल अप्रोचला अधिक भर दिला असून विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे.  त्यात इंटर्नशीप, ऑन द जॉब ट्रेनिंग अनिवार्य करण्यात आला आहे.  यासाठी तसेच प्लेसमेंट याकरीता माजी विद्याथ्र्यांनी आजी विद्याथ्र्यांना संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.  यासाठी आम्ही आजी आणि माजी विद्याथ्र्यांचा संवाद आजच्या कार्यक्रमानिमित्ताने ठेवला आणि त्यातून विद्याथ्र्यांना निश्चितच फायदा होईल.  पाच विद्याथ्र्यांची मेंटॉरशीप प्रत्येक माजी विद्याथ्र्यांनी स्वीकारावी, असे आवाहन करुन दरवर्षी हा मेळावा आयोजित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  विद्यापीठातील अल्प मनुष्यबळ लक्षात घेता आणि विद्यापीठाची आर्थिक बाजू लक्षात घेता आर्थिक सहाय्य देण्याबाबत माजी विद्याथ्र्यांनी विचार करावा, असेही कुलगुरू याप्रसंगी म्हणाले.

माजी विद्याथ्र्यांचे मनोगत

                   माजी विद्यार्थी श्रीमती शितल राठोड, श्री संजय कराड, डॉ. प्रशांत गवई, श्री प्रवीण वानखडे, डॉ. दिलीप कापडे, डॉ. निलेश मनवार, डॉ. संतोष चव्हाण हे मोठ¬ा पदांवर कार्यरत असून विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.  विद्यापीठामुळे आम्ही घडलो, आम्हाला दिशा मिळाली आणि म्हणूनच आम्ही आज मोठ¬ा पदावर कार्यरत असून समाजाला सेवा देत आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याची भावना या माजी विद्याथ्र्यांनी मनोगतातून व्यक्त केली.

यु.डी.आर.एफ. विभागाचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार

                   महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे दरवर्षी विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागाचे युनिव्हर्सिटी डिपार्टमेन्ट रँकींग फ्रेमवर्क केल्या जाते.  यावर्षी यु.डी.आर.एफ. मध्ये प्रथम क्रमांक भौतिकशास्त्र विभाग, द्वितीय संगणकशास्त्र विभाग व तृतीय बायोटेक्नॉलॉजी विभागाने मिळविला.  या उच्चतम कामगिरीबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी त्या विभागाचे विभागप्रमुख व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला.

                   यावेळी माजी प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके, भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. श्रीनिवास ओमनवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने तसेच महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने मेळाव्याची सुरुवात झाली.  शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुस्तक देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  डॉ. प्रशांत गावंडे व डॉ. स्वाती शेरेकर यांनी प्रास्ताविकतेतून माजी विद्यार्थी मेळाव्यामागील भूमिका विषद केली.  श्री आनंद यादव यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.  यावेळी उपस्थित सर्व माजी विद्याथ्र्यांचा कुलगुरूंच्या हस्ते ससन्मान सत्कार करण्यात आला.  संचालन कु. मेघा कोटक यांनी, तर आभार श्री अक्षय बांगर यांनी मानले.  माजी विद्यार्थी कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, माजी विद्यार्थी तसेच विभागातील विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button