AmravatiLatest NewsSocial News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात स्वामी विवेकानंद जयंती साजरी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्रात युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून मोठ¬ा उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन तसेच स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. योगे·ार कुरवाडे यांनी दिली.



