AmravatiLatest NewsSocial News

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यापीठाच्यावतीने 12 जानेवारी रोजी युवा संमेलनाचे आयोजन

अमरावती (दि. 09.01.2026) : स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो.  त्यानिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र, विद्यार्थी विकास विभाग आणि श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार सभागृह येथे युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे भूषविणार असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांचे शुभहस्ते युवा संमेलनाचे उद्घाटन संपन्न होईल.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे व स्वामी विवेकानंद तत्वज्ञान अभ्यासक, मुंबई तथा समाजसेविका श्रीमती श्रद्धा व्यास उपस्थित राहतील.
                 तरी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यापीठाच्यावतीने आयोजित युवा संमेलनाला जास्तीतजास्त संख्यने उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, श्रीरामकृष्ण विवेकानंद समितीचे अध्यक्ष श्री हरिहर जिराफे, स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. योगे·ार कुरवाडे व विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button