विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळाव्याचे 24 जानेवारी रोजी भव्य आयोजन

अमरावती : – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठ परिसरातील विवेकानंद भवन येथे दि. 24 जानेवारी रोजी विद्यापीठाच्या माजी विद्याथ्र्यांच्या भव्य मेळाव्याचे (ऋणानुबंध) आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन सकाळी 11 वाजता कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याची संकल्पना स्ट्रेंग्थनिंग अल्युमनी एंगेजमेंट फॉर अॅकेडमिक एक्सलन्स, रिसर्च कोलॅबरेशन अॅन्ड करिअर मेन्टोरिंग या विषयावर आधारित आहे. मेळाव्याचा उद्देश विद्यापीठ व माजी विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, संशोधन व उद्योग सहकार्याला चालना देणे आणि विद्याथ्र्यांसाठी करिअर मार्गदर्शन व मेंटरशिप उपलब्ध करून देणे हा आहे. मेळाव्यामध्ये माजी विद्याथ्र्यांचे अनुभव कथन, शैक्षणिक नेटवर्किंग, संशोधन व नवोपक्रम, उद्योग संलग्नता, कौशल्य विकास उपक्रम, अभ्यासक्रम समृध्दी तसेच नवीन शैक्षणिक धोरणावर विचारमंथन अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर विभागस्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यामध्ये विद्यापीठातील विविध विभागांचे माजी विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पदवी, पदव्युत्तरचे विद्यार्थी मोठ¬ा संख्येने सहभागी होणार आहेत. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटना परिश्रम घेत असून नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यापीठाच्या विकासात माजी विद्याथ्र्यांचा सक्रिय सहभाग वाढेल असा विश्वास व्यक्त होत आहे. तरी अधिकाधिक माजी विद्याथ्र्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचेवतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे.



