AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील तीन विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

अमरावती (दि. 02.01.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी राज अनिल पारखी (प्रथम), कु. साक्षी गजानन चोपकर (तृतीय) व कु. स्नेहल रघुनाथ शिवणकर (पाचवा) विद्यापीठाच्या उन्हाळी-2025 मध्ये घेण्यात आलेल्या एम.एस्सी. भाग-2 भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे, डॉ. जी.जी. मुळे, प्रा. कु. श्वेता वाघमारे, प्रा. प्रियांका गोळे, प्रा. एस.व्ही. राठोड, प्रा. एन. एस.थोरात, प्रा. व्ही. ए. लोडे, प्रा.व्ही.डी. भोरजार या शिक्षकवृंदांचे विद्याथ्र्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विद्याथ्र्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
                भौतिकशास्त्र विभागाचे आतापर्यंत 25 विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत, त्यात अनेक विद्याथ्र्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. विज्ञान स्नातकोत्तर ( मास्टर ऑफ सायन्स) भौतिकशास्त्र हा अभ्यासक्रम करून अनेक विद्यार्थी, वैज्ञानिक, रेडिओलॉजिस्ट, हवामानशास्त्रज्ञ, फॉरेन्सिक लॅबमध्ये विश्लेषक, आयएएस, वायरलेस स्ट्रीममध्ये पोलीस अधीक्षक, प्राध्यापक, व्याख्याते, शिक्षक, दूरसंचार अधिकारी म्हणून नियुक्त झालेले आहेत. विभागामध्ये शैक्षणिक मूल्यांची जोपासना, शिस्त राखणे, संशोधनासाठी प्रोत्साहन, विद्याथ्र्यांमध्ये प्रभावी वृत्तीचा प्रसार करणे यासाठी मेहनत घेतली जाते, जेणेकरून विद्यार्थी सक्षम होतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button