AmravatiLatest NewsMaharashtra

नूतन वर्षानिमित्त अमरावतीत वाहतूक व्यवस्थेत बदल – नागरिकांनी नोंद घ्यावी

अमरावती, ३० डिसेंबर २०२५:

नूतन वर्षानिमित्त बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

आदेशानुसार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील सर्व रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहेत. यात खालील मार्गांचा समावेश आहे:

  • उड्डाणपूल, गाडगेबाबा समाधी मंदिरापासून शिवाजी शिक्षण संस्था व जिल्हा स्टेडियमकडे जाणारा उड्डाणपूल
  • इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन
  • कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट
  • कुशल ऑटोकडे जाणारा उड्डाणपूल

शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३३ (१) (ब) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ नुसार आदेश निर्गमित केला आहे.

पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी नागरिकांना या आदेशाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button