AmravatiLatest Newspolitics

अमरावतीत शिंदे गटाच्या शिवसेनेत उमेदवारी अर्ज वाटपावरून गोंधळ; कार्यकर्त्यांचा संताप

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत उमेदवारी अर्ज वाटपावरून मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र समोर आले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. मात्र अनेक इच्छुकांना एबी फॉर्म तसेच उमेदवारी अर्ज न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे काही ठिकाणी जोरदार वाद झाले, तर काही वेळा धक्काबुक्कीचे प्रकारही घडल्याची माहिती आहे. पक्ष कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाराज कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात उघडपणे संताप व्यक्त करत आपल्या नाराजीचा सूर आळवला.

विशेष म्हणजे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ काही तासच शिल्लक असताना उमेदवारीबाबतचा गोंधळ वाढल्याने इच्छुक उमेदवारांची चिंता अधिकच वाढली आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेतील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली असून, या गोंधळाचा आगामी महानगरपालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button