गो. से. महाविद्यालयात गणित अभ्यास मंडळाची स्थापना

खामगाव : गो से कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात खामगाव येथे दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय गणित दिवस औचित्य साधून गणित अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. या अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एस तळवणकर, प्रमुख पाहुणे डॉ नितेश घुंगरवार ,विशेष उपस्थिती म्हणून प्रा एस डी वाघ व प्रा सचिन शिंगणे उपस्थित होते. वरिष्ठ महाविद्यालय गणित अभ्यास मंडळात अध्यक्ष कु स्नेहा उगले, उपाध्यक्ष ओम गिऱ्हे, सचिव कु सोनल ठाकरे, सहसचिव विशाल पवार , कोषाध्यक्ष कु गौरी इंगळे व सदस्य म्हणून कु रेश्मा शेगोकर , कु नेहा खानचंदानी, कु गायत्री बगाडे,प्रसाद ठाकरे, कु शिवानी कोल्हे, कु हर्षदा सोनोने , कु श्रेया तेल्हारकर ,मोहम्मद इफ्राज, कु निधी बनसोड, कु अनुजा ढगे यांची निवड झाली .तसेच कनिष्ठ महाविद्यालय गणित अभ्यास मंडळात अध्यक्ष कु खुशी सिरसाट, उपाध्यक्ष भाग्येश शेजाव, सचिव कु पूर्वा पहुरकर, सहसचिव कु श्रुती अजने, कोषाध्यक्ष संघदीप वाकोडे, सदस्य म्हणून कु धनश्री राऊत,कु जान्हवी बाळापुरे ,कु राधा कडले, यश सरदार ,ओम जवरे,आनंद डोंगे यांची निवड झाली. या मंडळाच्या माध्यमातून गणितीय प्रश्नमंजुषा, सूत्रस्पर्धा, गणितीय खेळ, तज्ज्ञ व्याख्याने व मार्गदर्शन सत्रे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पद्माकर कायपेल्लीवार यांनी केले तर आभार प्रा योगेश टापरे यांनी मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल आत्मविश्वास व आवड निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा नप्ते, प्रा डॉ कुलकर्णी, प्रा ढाले , प्रा सरकटे, प्रा निमकर्डे प्रा काळे, प्रा मोगल, प्रा जगताप, प्रा खरात, प्रा कदम व शिक्षकेत्तर कर्मचारी यश मोरे उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



