International NewsLatest NewsSocial News

4030 किलोमीटरची मानवतेसाठी धाव; इंग्लंडच्या धावपटू हना लोक्स यांची ‘प्रोजेक्ट सॉल्ट रण’ यात्रा वाशीममध्ये दाखल

गरिब, अनाथ आणि वृद्धांच्या मदतीसाठी भारतभर सुरू आहे प्रेरणादायी रन

वाशीम | प्रतिनिधी

गरिब, अनाथ आणि वृद्धांच्या मदतीसाठी इंग्लंडहून भारतात आलेली एक धावती प्रेरणा सध्या देशभर लक्ष वेधून घेत आहे. इंग्लंडच्या 41 वर्षीय धावपटू हना लोक्स (Hannah Lox) यांनी सुरू केलेली ‘प्रोजेक्ट सॉल्ट रण’ ही मानवतावादी धावयात्रा आता वाशीम जिल्ह्यात दाखल झाली आहे.

तब्बल 4030 किलोमीटर अंतराची ही अवघड धाव केवळ क्रीडेसाठी नाही, तर समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी समर्पित आहे.


पंजाब ते बंगाल सीमेपर्यंतचा थरारक प्रवास

‘प्रोजेक्ट सॉल्ट रण’ अंतर्गत ही धावयात्रा 24 ऑक्टोबर रोजी पंजाबमधील भारत–पाकिस्तान सीमेवरील फिरोजपूर येथून सुरू झाली. हा प्रवास कोलकात्याजवळील भारत–बांगलादेश सीमेवर पूर्ण होणार आहे.

गेल्या 60 दिवसांपासून सातत्याने धाव घेत, हना लोक्स यांची ही प्रेरणादायी यात्रा वाशीम जिल्ह्यातील रिसोड शहरात दाखल झाली आहे.


2400 किलोमीटरचा टप्पा वाशीममध्ये पूर्ण

24 डिसेंबर रोजी रिसोड–मेहकर मार्गावर धाव घेत असताना, रिसोड तालुक्यातील वाकद गावाजवळ हना लोक्स यांनी 2400 किलोमीटरचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला.
या उपक्रमात दररोज सरासरी 42 किलोमीटर धावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


सहकाऱ्यांचा आणि वाहनाचा आधार

या संपूर्ण प्रवासात अ‍ॅलेक्स, जोएल आणि नारली हे सहकारी हना लोक्स यांच्यासोबत आहेत.
त्यांच्या मागे मध्य प्रदेश नोंदणीचे एक चारचाकी वाहन असून, त्यामध्ये राहणे, खाणे-पिणे आणि आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


आणखी 38 दिवसांची मानवतेची धाव

आतापर्यंत 2400 किलोमीटरचा टप्पा पार केलेल्या हना लोक्स यांची ही धावयात्रा पुढील सुमारे 38 दिवसांत कोलकात्याजवळील भारत–बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचणार आहे.
मानवतेसाठी सुरू असलेली ही धाव अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button