AmravatiLatest News

विद्यापीठात माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

अमरावती – (दि. 25.12.2025) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात आली.  यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.  जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  संचालन व श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button